Weather Update
sakal
नाशिक: शहर व परिसरात उन्हाचा कडका कायम असून, शुक्रवारी (ता. १३) कमाल तापमानाचा पारा ३७.८ अंशावर स्थिरावला. वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्य घामाघूम झाले आहेत. दरम्यानच्या काळात मंगळवार (ता. १७)पासून पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस व वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.