cold weather
sakal
नाशिक: शहरासह जिल्ह्यात थंडीने विळखा घट्ट करायला सुरुवात केली असून, सोमवारी (ता. १७) नाशिकमध्ये ९.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील शहरातील हे नीचांकी तापमान ठरले आहे. दुसरीकडे कुंदेवाडी येथे ८.३ अंश एवढ्या जिल्ह्यातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद झाली. थंडीच्या वाढत्या कडाक्यामुळे सर्वसामान्य गारठून गेले. निफाडमध्ये पारा स्थिर असला, तरी थंडीचा जोर कायम आहे.