esakal | १५ मार्चपर्यंत लग्न समारंभ आटोपून घ्या..!जाणून घ्या निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal - 2021-03-05T084415.365.jpg

१५ तारखे पर्यंत लग्न समारंभ पोलीस प्रशासनाची परवानगी आटोपून घ्यावेत. अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. कारण...

१५ मार्चपर्यंत लग्न समारंभ आटोपून घ्या..!जाणून घ्या निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रसासनाकडून काटेकोर नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात देखील आता कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. 15 मार्चनंतर लग्नसोहळे किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रम कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी होणार नाहीत.

१५ मार्चपर्यंत लग्न समारंभ आटोपून घ्या...

१५ तारखे पर्यंत लग्न समारंभ पोलीस प्रशासनाची परवानगी आटोपून घ्यावेत. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असेल. तसेच १५ मार्च नंतर घरगुती पद्धतीने हे कार्यक्रम होतील. अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एप्रिल- मे मध्ये लग्न ठरवित असलेले किंवा त्या दरम्यान करणार असल्यास या विचारांंवर विरजण पडले आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, जिल्हाबंदी करणे हा पर्याय आता योग्य नाही. धडधडित आपण सर्व बंद करणार नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले.

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरु

गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. आता त्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झाला आहे. जीवनावश्यक सेवा वगळून शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरु राहणार आहे. सोबतचं शाळा, महाविद्यालय, जलतरण तलाव, व्यायाम शाळा बंद राहणार असल्याची घोषणा, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

नाशिक जिल्ह्यात काय सुरु काय बंद?

नाशिकमध्ये लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला आहे का?
नाशिकमध्ये लॅाकडाऊन जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, एका महिन्यात चौपट वाढ झाली आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादण्यात आले आहे. जे नागरिक उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

नाशिकमध्ये कोणकोणते निर्बंध असतील?
शहरातील सर्व शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस बंद राहणार. दहावी, बारावी परीक्षा जवळ आल्याने त्यांनी कॉलेजला जाण्याबाबत ऐच्छिक निणर्य घ्यावा. नाशिक, नांदगांव, मालेगाव, निफाड मधील सर्व शाळा बंद. जीवनावश्यक सेवा वगळून शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरु राहणार. शहरातील सर्व आठवडे बाजार बंद.व्यायामशाळा, क्रिडा स्पर्धा यांना बंदी. सामाजिक, सार्वजनिक, धार्मिक सर्व समारंभ बंद राहणार. आर्थिक आणि आरोग्य या सगळ्यांचा विचार करून हे निर्णय घेण्यात आले आहेत.

हॅाटेल-रेस्टॅारंट/बार सुरु असतील का?
खाद्यगृह, बार हे सकाळी 7 ते संध्याकाळी 9 पर्यंत 50 टक्के क्षमतेनेचं सुरु ठेवता येणार आहे.

शाळा कॉलेज सुरु राहणार की बंद?
शहरातील सर्व शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस बंद राहणार. तर नाशिक, नांदगांव, मालेगाव, निफाड मधील सर्व शाळा बंद. दहावी, बारावी परीक्षा जवळ आल्याने त्यांनी कॉलेजला जाण्याबाबत ऐच्छिक निणर्य घ्यावा.

loading image