तुम्हीही लग्नासाठी हॉल अन् लॉन्सची प्री-बुकिंग केली होती? मग ही बातमी तुमच्यासाठी

lawns wedding.jpg
lawns wedding.jpg

नाशिक / सटाणा : सध्या लॉकडाउनमुळे सटाणा शहर व तालुक्‍यातील विवाह सोहळे खोळंबले आहेत. सहा महिन्यांत लग्न किंवा इतर शुभकार्यासाठी लॉन्सचे बुकिंग केले होते. लॉकडाउनमुळे सर्व शुभकार्ये थांबली असली, तरी शहरातील लॉन्स आणि मंगल कार्यालयाकडून ग्राहकांना अनामत रक्कम परत देणे आता शक्‍य नाही. त्याऐवजी असा निर्णय शहरातील लॉन्स व मंगल कार्यालय मालकांनी घेतला आहे. 

असा झाला निर्णय
सटाणा येथील सूर्या लॉन्सवर शहरातील नंदनवन, जय मल्हार, आनंद, सप्तपदी, विष्णू बालाजी, राधाई, स्वामी समर्थ लॉन्स, रामजी व गुरुप्रसाद मंगल कार्यालय या लॉन्स व मंगल कार्यालय मालकांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ग्राहकांचे पूर्णत: नुकसान टाळले जाणार आहे. मात्र, लॉन्स आणि मंगल कार्यालय व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आता ग्राहकांना दिवाळीनंतरच्या लग्नकार्याच्या तारखा बदलून दिल्या जाणार असून, जमा असणाऱ्या ऍडव्हान्स रकमेची क्रेडिट नोट देण्यात येईल. येत्या दोन वर्षांत म्हणजे 30 जून 2020 पर्यंत ग्राहकांचे कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा आप्तेष्टांपैकी कोणाच्याही विवाह सोहळ्याचे बुकिंग करताना ही अनामत जमा रक्कम वापरता येणार आहे. सोहळ्याची तारीख बदलून घेतल्यास नवीन तारखेला बुकिंगची रक्कम ग्राह्य धरून संबंधित ग्राहकांना लॉन्स व कार्यालय उपलब्ध करून देण्याचा निर्णय शहरातील लॉन्स व मंगल कार्यालय मालकांनी घेतला आहे. 

अनामत परत न देता लग्नाच्या तारखा बदलून मिळणार 
लॉकडाउननंतर लग्नसराईचा हंगाम आता संपला असून, जानेवारी ते जूनदरम्यान सर्वाधिक लग्नसोहळे होतात. यंदा फेब्रुवारीपर्यंतचेच विवाह सोहळे व्यवस्थित पार पडू शकले. शहरात जवळपास 15 मंगल कार्यालये आहेत. या कार्यालयांना महावितरणकडून वीजबिल, पालिकेकडून मालमत्ताकर, पाणीपट्टी व्यापारी दराने आकारण्यात येते. घरपट्टी, बिनशेती शेतसारा, देखभाल-दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचे पगार, बॅंकांचे हप्ते आदी गोष्टींचाही आर्थिक भार कोरोनाच्या संकटामुळे मंगल कार्यालयाच्या मालकांना सोसावा लागणार आहे. शासनाने लॉन्समालकांसाठी पॅकेज देऊन दिलासा देण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. सचिन भामरे, विकी सोनवणे, संदीप निकम, पराग सोनवणे, स्वप्नील बागड, आनंद पाटील, अनिल मंजुळे, नितीन सोनवणे, तानाजी सोनवणे आदी लॉन्समालक उपस्थित होते. 
दरम्यान, सर्व लॉन्समालकांनी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com