
सह्याद्री संवाद - ‘क्रिकेटने मला काय शिकविले?‘
नाशिक : ‘सह्याद्री फार्म्स’च्या (Sahyadri Farms) सह्याद्री संवाद या उपक्रमांतर्गत प्रसिध्द क्रिडा समीक्षक सुनंदन लेले (Sports critic Sunandan Lele) यांचे ‘क्रिकेटने मला काय शिकविले?‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. आपल्या वैयक्तिक वा व्यावसायीक जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रिकेटकडे कसे पहावे, क्रिकेटकडून (Cricket) काय शिकावे यावर ते या कार्यक्रमात दृकश्राव्य (Audiovisual) तंत्राचा आधार घेत संवाद साधणार आहेत. शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी ५:३० वाजता सह्याद्री फार्म्सच्या मोहाडी (ता.दिंडोरी) येथील प्रांगणात हा कार्यक्रम होईल.
हेही वाचा: उकाड्याने शहरवासियांची लाहालाही; तापमान पुन्हा ४० अंशाच्या उंबरठ्यावर
सुनंदन लेले हे मागील ३० वर्षांपासून क्रिडा पत्रकारितेत आहेत. त्यांनी २०० पेक्षा जास्त कसोटी सामन्यांचे तर ३०० पेक्षा जास्त एक दिवसीय सामन्यांचे वार्तांकन केले आहे. तसेच वर्ल्ड कप (ODI World Cup) व टी-20 वर्ल्डकपचेही (T20 World cup) वार्तांकन त्यांनी केले आहे.त्या आधी त्यांनी महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील संघाचे कप्तानपदही भूषविले आहे.
हेही वाचा: Nashik : ट्रकसह 24 लाखांचा अवैद्य मद्यसाठा जप्त
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून क्रिकेटप्रेमी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सह्याद्री फार्म्स’तर्फे करण्यात आले आहे
Web Title: What Did Cricket Teach Me Sports Critic Sunandan Leles Lecture At Sahyadri Farms Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..