तुमचा असा परफ्यूम लावणे 'ती'ला लुभावणार नसेल तर नवलच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

purfumed attract female.jpg

स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी पुरुष काय - काय नाही करत असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. बियर्ड, क्लिन शेविंग, पिळदार मिशा, शरीररीष्टी, नियमित फेशियल अन् त्याचसोबत सध्या क्रेझ आहे ती परफ्यूमची. वैविध्यपूर्ण परफ्यूम वापरुन तरुणींना कसे आकर्षित करता येईल याकडे तरुणांचा अधिक भर दिसून येत आहे.

तुमचा असा परफ्यूम लावणे 'ती'ला लुभावणार नसेल तर नवलच!

नाशिक : स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी पुरुष काय - काय नाही करत असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. बियर्ड, क्लिन शेविंग, पिळदार मिशा, शरीररीष्टी, नियमित फेशियल अन् त्याचसोबत सध्या क्रेझ आहे ती परफ्यूमची. वैविध्यपूर्ण परफ्यूम वापरुन तरुणींना कसे आकर्षित करता येईल याकडे तरुणांचा अधिक भर दिसून येत आहे.

फळांच्या सुगंधाचा परफ्यूम 

फळांच्या सुगंधाचा परफ्यूम वापरणारे तरूण मुलींना त्यांच्या पर्सनॅलिटीमुळे पसंत पडतात. तरूणींचं मत आहे की, असे तरूण मनाने साफ असतात. रिपोर्टनुसार, असे तरूण हसमुख असतात आणि आपल्या पार्टनरला त्रास देत नाहीत.

लॉन्ग लास्टिंग परफ्यूम

लॉन्ग लास्टिंग परफ्यूमचा वापर करणारे तरूणही तरूणींना पसंत असतात. असे तरूण तरूणींना पसंत असतात कारण ते घामाच्या दुर्गंधीपासून बराचवेळ दूर राहता. रिसर्च नुसार, असे तरूण आपल्या बॉडीसाठी फार अॅक्टिव असतात. अशात परफ्यूम खरेदी करताना याचीही काळजी घ्यावी.

हेही वाचा > घरात साधी चिठ्ठी लिहून जेव्हा 'दोघी' पळून जातात तेव्हा.....

चॉकलेट फ्रेगरेन्स

चॉकलेट प्रत्येक तरूणीला आवडतं. त्यामुळे जर तरूणांनी चॉकलेटचा सुगंध असलेला परफ्यूम लावला तर त्यांच्याकडे तरूणी आकर्षित होतात. चॉकलेटच्या सुगंधाकडे तरूणी मानसिक रूपाने आकर्षित होतात. त्यामुळे तुम्ही चॉकलेट परफ्यूम वापरत असाल तर तुमचा फायदाच आहे. नसाल वापरत तर विचार करायला हरकत नाही.

स्ट्रॉंग फ्रेगरेन्स

या फ्रेगरेन्सचा वापर करणाऱ्या तरूणांनाही तरूणी पसंत करतात. अशाप्रकारच्या पुरूषांना कोणत्याही गोष्टी जास्त उत्सुक मानलं जातं. तसेच याने तरूणाच्या बोल्ड अंदाजाची  माहिती मिळते. तरूणींचं असं मत आहे की, असे तरूण जास्त रोमॅंटिक असतात.

हेही वाचा > लासलगाव जळीतकांड प्रकरण : 'ती'ला दिला अखेरचा निरोप!

अल्कोहोलचा सुगंध

तुम्ही पाहिलं असेल की, काही तरूण फारच विचित्र सुगंध असणारे परफ्यूम लावतात. यांचा सुगंध अल्कोहोलच्या सुगंधाशी मिळता-जुळता असतो. या परफ्यूमचा वापर करणाऱ्या तरूणांना तरूणी क्लासी मानतात. रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, अशा परफ्यूमचा वापर करणारे तरूण जास्त उत्तेजक असतात.

हेही वाचा > PHOTOS : सिग्नलवरील "ते' शेवटचे सेकंद अन् ऑडीचालकाची घाई..थराराक!

loading image
go to top