Nashik News : अतिक्रमण पथकच जेव्हा अतिक्रमणात अडकते!

Encroachment team of Municipal Corporation stuck in road encroachment in the area.
Encroachment team of Municipal Corporation stuck in road encroachment in the area.esakal

जुने नाशिक : मेनरोड धुमाळ पॉइंट ते दहिपूल भागात असलेल्या अतिक्रमणाकडे महापालिका दुर्लक्ष करत असते. त्याच अतिक्रमणात, अतिक्रमण पथकास अडकण्याची वेळ आल्याचे चित्र दहिपूल परिसरात बघावयास मिळाले. महापालिकेचे अतिक्रमण पथक गुरुवारी (ता.१) दुपारी अचानक शालिमार, मेनरोड परिसरात दाखल झाले. (When encroachment team gets involved in encroachment nashik Latest Marathi News)

रस्त्यावरील व्यवसायिकांची एकच धावपळ उडाली. विक्रते आपले दुकान घेऊन सैरावैरा धावपळ करताना आढळून आले. मोठ्या व्यावसायिकांनीदेखील त्यांच्या दुकानासमोर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी पळापळ केली. परंतु घडले काही वेगळेच पथक केवळ नावाला आल्याचे दिसून आले. कुठलीही कारवाई न करता ताफा शालिमार ते दहिपुलापर्यंत घेऊन गेले आणि काही मिनिटातच माघारी परतले. पुन्हा पथकाने अतिक्रमण काढण्याकडे काणाडोळा केल्याचे दिसून आले. व्यावसायिकांमध्येदेखील हास्य पिकल्याचे दिसून आले. कारवाई करायचीच नव्हती तर उगाच हा खटाटोप का करण्यात आला, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आले.

दुसरीकडे धुमाळ पॉइंट येथून दहिपूल परिसरात जाताना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे पथकाच्या वाहनांनाच अडकून राहावे लागले. परिसरातील अतिक्रमणामुळे एका बाजूस पथकातील वाहन तर दुसऱ्या बाजूला अन्य वाहतूक यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना बराच वेळ त्रास सहन करत ताटकळत राहावे लागले. वारंवार या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण होत असतानादेखील महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अशा प्रकारच्या अडचणींना नागरिकांना दैनंदिन सामोरे जावे लागते. त्यात गुरुवारी चक्क अतिक्रमण पथकासच अडकून राहण्याची वेळ आली.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Encroachment team of Municipal Corporation stuck in road encroachment in the area.
Nashik News : गोदावरीचा अमृतजल योजनेमध्ये समावेशाने पर्यावरणप्रेमींकडून आनंद

पथकाचे संचलन

शालिमार, मेनरोड त्यानंतर दहीपूल परिसरात अतिक्रमण पथकाचा ताफा दाखल झाला. रस्त्यावरील व्यावसायिकांना मोहीम असल्याचे वाटल्याने त्यांची धावपळ उडाली. प्रत्यक्षात मात्र एका कार्यक्रमाची मिरवणूक दहिपुल, मेनरोड, शालिमार परिसरातून जाणार असल्याने अतिक्रमण पथक कारवाईसाठी नाही तर केवळ संचलनासाठी आल्याचे कळताच विक्रेत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पथकाचा मात्र उद्देश सफल होऊ शकला नाही. त्यांची पाठवताच पुन्हा व्यावसायिकांनी रस्त्यावर आपल्या दुकाने थाटल्याचे दिसून आले.

Encroachment team of Municipal Corporation stuck in road encroachment in the area.
Nashik News : बसथांबे बनले मद्यपींचे अड्डे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com