निराशाजनक! पाऊस झाला की या महामार्गाची बनते नदी.. काय आहे कारण? वाचा..

When it rains this highway becomes a river nashik marathi news
When it rains this highway becomes a river nashik marathi news

नाशिक/निफाड  :  थोड्या पावसातही महामार्गाची नदी बनत महामार्गावरील वाहतूक दरवर्षी विस्कळीत होत असते .सार्वजनिक बांधकाम विभागाच्या( बी ओ टी) दुर्लक्षामुळे हि समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहे तर पावसाळ्यात वारंवार महामार्ग बंद पडत असल्यामुळे वाहतुकदार तसेच निफाडकरांचे हाल होत आहेत. 

नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील निफाड येथील शांतीनगर चौफुली ते शिवरें फाटा दरम्यान हा प्रकार घडत आहे. गेल्या 5 आँगस्टला सायंकाळी साडेसहा ते 8 वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे शांतीनगर चौफुली ते आचोळा नाला ,शिवरें फाटा या तीन किलोमीटर मार्गावर अक्षरशः वाहणारी नदी वाटावी इतके पाणी रस्त्यावर आल्याने मगामार्ग गडप झाला होता यामुळे तीन ते चार मोटरसायकलस्वार कोसळले,चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या काहींना हा मार्ग एक तास बंद झाल्यामुळे 20 ते 25 किमी चा फेरा करून लासलगाव मनमाड जावे लागले,या दरम्यान रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पम्प, एच पी पेट्रोल पम्प या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने पेट्रोलच्या टाकीत पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. 
आशा घटना गेल्या काही वर्षात अनेकदा घडत आहे. 

ही आहेत कारणे

या महामार्गावर चौपदरीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पाणी काढण्यासाठी गटार व चेंबरच तयार केलेले नाही, अर्धा तास जरी पाऊस झाला तरी उजव्या बाजूच्या रस्ता दुभाजकावरून पाणी डाव्या बाजूला जाते आणि हा महामार्ग जलमय होऊन जातो,पूर्वी नैसर्गिक पाण्याचा स्तोत्र वाहून जाणारे ओढे,नाले गडप झाल्याने हे पाणी रस्त्यावर साचून राहते,त्यामुळे हा रस्ता खचून खराब होतो खड्डे पडतात,वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते,शेतात पाणी जाऊन पिके खराब होतात. 

बांधकाम विभागाची डोळे झाक

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बी ओ टी विभागाकडे हा रस्ता देखभालीसाठी आहे रस्त्यावर मोठाले खड्डे,दोन्ही बाजूने झाडांच्या फांद्या थेट रस्त्यावर आल्या आहे,आणि त्यात आता पावसाच्या पाण्याने झालेली परिस्थिती यामुळे या महामार्गावरील प्रवासी, पेट्रोल पम्प चालक,व्यावसायिक यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.  जरा पाऊस झाला की महामार्गाचे रुपांतर नदीत होते याकडे बांधकाम विभागाची कमालीची डोळे झाक होते. 

नेहमीच पावसाच्या पाण्यान महामार्ग बंद पडतो वाहनांचे आपघात होतात संबंधितांनी याकडे लक्षद्यावे अन्यथा अंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल 
- देवदत कापसे, नगरसेवक निफाड 

महामार्ग तयार झाल्याव आनंद झाला मात्र नवाळीचे नव दिवस या प्रमाणे पावसाळ्यात पाणि आणि इतर वेळेला खड्डे ठरलेल समिकरण या बाबत बांधकाम विभागाला तहसिल कार्यालयाला निवेदने देऊन झालीत तरी सुधारणा झाली नाही मी स्वतः यदा दोन तास अचोळा येथे अडकुन पडलो होतो या समस्येच गांभिर्य लोकप्रतीनिधी आणि प्रशासनाने घ्यायला हवे 
-भिमराव साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com