

Nashik Kumbh Mela: प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याची सांगता झाल्यानंतर आता पुढचा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ला नाशिकमध्ये होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. यासाठी सध्या शासनाच्या प्रतिनिधींसोबत आखाड्यांच्या प्रतिनिधींचं बैठकांची सत्रं सुरु आहेत. पण यामध्ये प्रमुख वाद उफाळून आला आहे तो म्हणजे नाशिकचा कुंभमेळा त्र्यंबकेश्वरला होणार की नाशिकला? शैव आणि वैष्णव आखाड्यांमध्ये यावरुन वाद सुरु आहे.