अखेर गुढ उलगडले! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच रचला डाव; सात जण जेरबंद

अखेर गुढ उलगडले! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच रचला डाव; सात जण जेरबंद

पेठ (नाशिक) : पेठ येथे सापडलेल्या मृतदेहाची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. सचिन उर्फ काळु दुसाने (रा. गणेश नगर, निफाड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिनच्या पत्नीसह, तिचा प्रियकर व खुनात मदत करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह फेकून दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपासास सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा खून निफाड येथील दत्तात्रय महाजन याने इतर साथीदारांसह मिळून केला. त्यानुसार पोलिस अधीक्षक सचिन पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील, सआयक पोलिस उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, संजय गोसावी, प्रभाकर पवार, अंमलदार नितीन मंडलिक आदींच्या पथकाने तपास सुरू केला.

अखेर गुढ उलगडले! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच रचला डाव; सात जण जेरबंद
नाशिक महापालिकेची प्रभाग रचना जाहीर; इच्छुकांची कार्यालयात झुंबड

बेदम मारहाण करून केले ठार..

पोलिसांनी संशयित दत्तात्रय यास ताब्यात घेत चौकशी केली असता सुरुवातीस त्याने टाळाटाळ केली. मात्र सखोल चौकशीत त्याने सचिन दुसाने यांचा खून केल्याची कबुली दिली. दत्तात्रय याचे शोभा दुसाने हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. २२ जानेवारीला सचिनच्या घरातच सचिनला बेदम मारहाण करून जीवे मारले. यासाठी महाजन याने सचिनची पत्नी शोभा हिच्यासह नाशिक येथील डोसा विक्रेता संदिप किट्टू स्वामी (३८, सिडको), अशोक मोहन काळे ३०, रा. दत्त नगर, चिंचोळे) यांनी मदत केली. खून केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले हत्यारे, मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी संशयितांना रिक्षा चालक गोरख नामदेव जगताप (४८, राणा प्रताप चौक, सिडको नाशिक) व पिंटु मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे (३६ रा. निफाड) यांनी मदत केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

अखेर गुढ उलगडले! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच रचला डाव; सात जण जेरबंद
रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

7 संशयित आरोपींना अटक

सचिनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली व सचिनने विक्री करण्यासाठी आणलेली एमएच. ४३ एडब्ल्यू १३०८ क्रमांकाची कारही पोलिसांनि जप्त केली आहे. ही कार संशयित आरोपी संदिप किटटू स्वामी याने अंबड आयटीआय लिंक रोडवरील भंगार व्यवसायि मुकरम जहिर अहेमद शहा (२६) यास विक्री केली होती. मुकरम याने कार तोडण्यास सुरुवात केली होती मात्र पोलिसांनी ती जप्त करीत मुकरम यासही अटक केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण 7 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडन 3 कार, 6 मोबाईल व एक लाखाची रोकड हस्तगत केली आहे.

अखेर गुढ उलगडले! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच रचला डाव; सात जण जेरबंद
टाटा मोटर्सच्या वाहनांची जानेवारीत विक्रमी विक्री, या कार ठरल्या टॉपर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com