तब्बल 37 वर्षे दिव्यांग पतीची सावित्रीकडून अविरत सेवा!

husband wife
husband wifeesakal

दहीवड (जि.नाशिक) : पती-पत्नी संसाररूपी रथाची दोन चाके असतात. एक रुतले, तर दुसऱ्याने साथ द्यायची असते. पती दिव्यांग असतानाही खचून न जाता ती त्यांचा आधार बनली. सत्यवानाला यमाकडून परत आणणाऱ्या सावित्रीप्रमाणेच परिस्थितीपुढे हात न टेकता ३७ वर्षांपासून पतीची अखंड सेवा करत संसाराचा गाडा समर्थपणे हाकत आहे. (wife-take-care-husband-37 years-nashik-marathi-news)

समाजात संसाराची सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे दांपत्य

ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथील हरी संतोष आहिरे महावितरणमध्ये रोजंदारी कामगार म्हणून वीजवाहिनीचे खांब उभे करण्यासाठी खोदकाम करत. नंतर २१ मे १९७९ मध्ये ते वायरमन म्हणून कायम सेवेत रुजू झाले. १९८४ मध्ये वीज खांबावर काम करत असताना ते खांबावरून कोसळले अन् त्यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्याकाळी इंदिरा गांधींची हत्येचे प्रकरण ताजे असल्याने सर्व महामार्ग बंद होते. त्यामुळे उपचारासाठी उशीर झाला. नंतर पुणे येथे एका खासगी रुग्णालयात मणक्याचा गॅप भरून काढण्यासाठी १५ किलोचे जॅकेट प्लास्टर टाकले, परंतु ते प्रयत्न अपयशी ठरले. पुणे येथील डॉक्टर हर्डीकर यांची भेटीची तारीख मिळाली, परंतु तेही महत्त्वाच्या कामानिमित अमेरिकेत निघून गेले. सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याने श्री. अहिरे यांना माघारी परतावे लागले. तेव्हापासून आजपर्यंत श्री. अहिरे यांच्या अर्धांगिनी लता अहिरे यांनी त्यांना साथ दिली. घरात दोन मुले, दोन मुली आणि पती यांची सर्व कामे करून प्रपंचाचा गाडा सौ. अहिरे यांनी नेटाने पुढे नेला. दोन्ही मुलींचे लग्न कले. दोन्ही मुले महावितरणमध्ये नोकरीस लावली. त्यासोबतच बरेच दिवस सौ. आहिरे यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसायही केला. पतीच्या सेवेने सुरू होणारा दिवस पतीच्या सेवेने मावळतो, अशी दिनचर्या सौ. आहिरे यांची आहे.

जोडीदार चांगला असेल, तर पडझडीचे आयुष्यही आनंदात जाते

जोडीदार चांगला असेल, तर पडझडीचे आयुष्यही आनंदात जाते. अनेक वर्षांपासून मी एकाच जागेवर आहे. अंथरुणावर खिळलेली व्यक्ती जास्तीत जास्त पाच ते दहा वर्षांचा सोबती असते. मी ३७ वर्षांपासून आनंदात जीवन जगत आहे. त्याचे सर्व श्रेय माझ्या पत्नीला जाते. मी तिचा शतशः आभारी आहे. - हरी आहिरे, ब्राह्मणगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com