Egg Demand
sakal
नाशिक
Egg Demand : उत्तर महाराष्ट्रातून रोज दोन कोटी अंड्यांची विक्री! चिकनचे दर स्थिर, मात्र अंड्यांच्या मागणीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ
Winter Triggers Sharp Rise in Egg Demand : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडी पडण्यास सुरुवात झाल्यामुळे अंडी आणि चिकनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई, गुजरातसह अन्य राज्यांतून आलेल्या मागणीमुळे अंड्यांचे दर वाढले आहेत, तर पोल्ट्री फार्ममधून होणारा पुरवठा सुरळीत असल्याने चिकनचे दर स्थिर आहेत.
नाशिक: शहर व जिल्ह्यातील पाऱ्यात घट झाल्याने थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. हिवाळा सुरू झाल्याने आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरणारी अंडी व चिकनच्या मागणीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. राज्यातील मुंबई, नाशिक या उपनगरांसह गुजरात व मध्य प्रदेशातूनही अंड्यांना मागणी असल्याने दर वाढले आहेत.
