नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई: तातडीने पाण्याचे टॅंकर रवाना-आदित्य ठाकरे

मेटघर गावातील पाड्यांवर भीषण पाणीटंचाई, महिलांना करावी लागतेय ३ तास पायपीट
Aaditya-Thackeray
Aaditya-Thackerayesakal

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या मेटघर गावात ' महादरवाजा' पाड्यावर भीषण पाणीटंचाई असून, महिलांना हंडाभर पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. अतिशय खोल विहीरीत या महिला उतरतायत. विहिरीच्या तळाशी गेलेलं पाणी छोट्या भांड्याने भरुन या महिला कशीबशी परिवाराची तहान भागवत आहेत. याठिकाणी आपण तातडीने पाण्याचे टॅंकर पाठवत असल्याचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय. (Water scarcity at Metghar village Nashik district)

जवळपास ३०० घरांसाठी हि विहीर एकच पाण्याचा स्त्रोत आहे. अतिशय धक्कादायक बाब म्हणजे विहीरीचे कठड्यांची दुरावस्था झालेली आहे. तर तळाशी जाण्यासाठी विहिरीतल्या खडकांचा आधार त्या घेतायत. अतिशय धोकादायक स्थितीत या महिला हंडाभर पाण्यासाठी उतरतायत. यावर महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतचं ट्विट करुन , "याठिकाणी तातडीने पाण्याची सोय करुन देण्यात येत असल्याचं म्हंटलंय. तसंच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी देखील आपण बोललो असल्याचं त्यांनी म्हंटलंय.

त्र्यंबकेश्वर बरोबरच नंदुरबारमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या आहेत. महिलांना तीन तास पायपीट करुन या विहीरीपर्यंत पोहचावं लागतं. नाशिकच्या पाणीटंचाईसंदर्भात अन्न व औषध पुरवठामंत्री छगन भुजबळ देखील उपाययोजना करत असल्याचं आदित्य ठाकरेंनी ट्विट करुन सांगितलेलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com