Nashik Accident News: कंटेनर-रिक्षाच्या अपघातात महिला ठार; दोघे गंभीर

नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी गावाजवळ शुक्रवारी (ता. २२) दुपारी कंटेनर आणि रिक्षामधील अपघातात ब्राह्मणवाडेच्या महिला ठार झाल्या आहेत.
A rickshaw was crushed after a container collapsed on the Nashik-Pune highway on Friday.
A rickshaw was crushed after a container collapsed on the Nashik-Pune highway on Friday.

Nashik Accident News : नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी गावाजवळ शुक्रवारी (ता. २२) दुपारी कंटेनर आणि रिक्षामधील अपघातात ब्राह्मणवाडेच्या महिला ठार झाल्या आहेत.

रिक्षातील महिला आणि पुरुष असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. (Woman killed in container rickshaw accident nashik news)

शिवाजी रामराजे हे सिन्नर येथून शिंदे मार्गे ब्राह्मणवाडे येथे रिक्षाने जात असताना महामार्गावर भरधाव वेगातील कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर रिक्षावर कोसळला. रिक्षामधील मंदाकिनी बाळासाहेब रामराजे (५५, रा. ब्राम्हणवाडे, ता. सिन्नर) या ठार झाल्या आहेत.

श्री. रामराजे (५२) आणि आशा विजय रामराजे (५२, दोघे रा. ब्राम्हणवाडे) हे जखमी झाले आहेत. श्री. रामराजे यांच्या डोक्याला मार लागला असून पाय फ्रॅक्चर झाला आहे.

A rickshaw was crushed after a container collapsed on the Nashik-Pune highway on Friday.
Nashik Accident News: खड्डे टाळण्याच्या नादात दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार

त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आशा रामराजे किरकोळ जखमी झाल्या असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

रिक्षा (एमएच १५ जेए २०६४) आणि कंटेनर (एमएच ४६ एफ १२०९) हे सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने जात होते. एका वाहनाला ओलांडण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले. अपघाताची माहिती समजताच, पोलिसांनी मदत कार्य करीत जखमींना रुग्णालयात हलविले. एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

A rickshaw was crushed after a container collapsed on the Nashik-Pune highway on Friday.
Nashik Accident News: कर्तव्यावरून घरी जाताना पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com