esakal | "कॉललिस्ट चेक केले मी..तुझे अफेअर आहे"..असे सांगत तिचे फोटो काढले अन्

बोलून बातमी शोधा

dispute.jpg

पीडितेच्या फिर्यादीनुसार 22 फेब्रुवारीला संशयित चौधरी याने पीडितेशी ओळख करीत तिला संदीप हॉटेलमधील खोलीत बोलविले. पीडितेची छायाचित्रे काढली. पीडितेच्या मोबाईलमधील कॉल लिस्ट पाहून तिच्यावर संशय घेत शिवीगाळ करीत मारहाण केली.

"कॉललिस्ट चेक केले मी..तुझे अफेअर आहे"..असे सांगत तिचे फोटो काढले अन्
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई नाक्‍यावरील हॉटेलमध्ये बोलावून पीडितेची छायाचित्रे काढली आणि सोशल मीडियावर शेअर करीत बदनामी व विनयभंग केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित प्रकाश शिवदास चौधरी (रा. मेहुणबारे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे.

असा घडला प्रकार...

पीडितेच्या फिर्यादीनुसार 22 फेब्रुवारीला संशयित चौधरी याने पीडितेशी ओळख करीत तिला संदीप हॉटेलमधील खोलीत बोलविले. पीडितेची छायाचित्रे काढली. पीडितेच्या मोबाईलमधील कॉल लिस्ट पाहून तिच्यावर संशय घेत शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर पीडितेचा मोबाईल व सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेला, तसेच मोबाईलमध्ये काढलेली छायाचित्रे त्याने पीडितेचे नातलग व सोशल मीडियाच्या ग्रुपवर शेअर करून बदनामी केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ तपास करीत आहेत.

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

हे माहित आहे का तुम्हाला?

एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे किंवा कृती करणे, एखादी वस्तू, गोष्ट दाखवणे, ती पाहण्यासाठी तिचे लक्ष वेधून घेणे किंवा तिच्या खाजागीपानाच्या अधिकाराचं उल्लंघन होईल असे वर्तन. या अपराधासाठी १ वर्ष सजा, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

हेही वाचा > लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...धक्कादायक घटना!