Women Fitnes
sakal
नाशिक: पीसीओडी, त्यातून वाढत जाणारे वजन, गर्भधारणेमध्ये येणाऱ्या अडचणी, प्रसूतीनंतर वाढलेले वजन, मोनोपॉज, प्री- मोनोपॉज आरोग्याच्या या वाढत्या समस्यांना रोखण्यासाठी व्यायामाशिवाय पर्याय नसल्याने महिलांचे जिमला येण्याचे प्रमाण वाढले आहे. शरीर आणि मन फीट ठेवण्यासाठी मेहनतीला प्राधान्य दिले जात आहे. खासकरून कोरोनानंतर आरोग्याच्या बाबतीत महिला अधिक जागृत झाल्याने ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या सूत्रातून महिला आता नियमित जिम करायला लागल्या आहेत.