Ramdas Athawale on women reservation bill controversy
esakal
नाशिक : महिलांना न्याय देण्यासाठी महिला आरक्षण विधेयक अत्यंत महत्त्वाचे होते. परंतु, विरोधकांनी राजकीय स्वार्थासाठी महिलांना न्यायापासून वंचित ठेवल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी विरोधकांवर केली. याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष देशभरात आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.