सावित्रीच्या लेकींची रेल्वे कारखान्यात नियुक्ती; पुरूषांच्या बरोबरीने करणार काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women workers  work in the railway factory manmad

सावित्रीच्या लेकींची रेल्वे कारखान्यात नियुक्ती

मनमाड (जि. नाशिक) : १९०६ साली स्थापन झालेल्या येथील रेल्वे कारखान्यात आतापर्यंत पुरुष कर्मचारी काम करताना दिसत होते. मात्र, आता महिला कर्मचारी भरती झाल्याने सावित्रीच्या लेकी पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या आहेत. कार्यालयीन कामकाजामध्ये महिलांची नियुक्ती करण्यास सुरवात झाली आहे.

महिला कर्मचाऱ्यांनी केले आपले कर्तृत्व सिद्ध

सावित्रीच्या लेकीही आता मागे नाहीत, याची प्रचिती येथील रेल्वे कारखान्यात आली. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने महिला काम करू लागल्या आहेत. मनमाड रेल्वे कारखान्याची स्थापना ही १९०६ साली झाली. सुरवातीला या कारखान्यामध्ये फक्त पुरुष कर्मचारी काम करीत होते. काळानुसार बदल होत गेले आणि कार्यालयीन कामकाजामध्ये महिलांची नियुक्ती करण्यास सुरवात झाली. अनुकंपा तत्वावर होणाऱ्या महिलांची नियुक्ती ही कार्यालयात व गुलजॉईड या विभागात करण्यात येत होती. पण, काळानुसार बदल होत गेला आणि सावित्रीच्या लेकीही मागे राहिल्या नाहीत. दोन वर्षांपूर्वी महिला कर्मचारी मालती पावरा ईओटी क्रनेड्राव्हरवर काम करीत आहे. ई.ओ.टी.क्रनेड्राव्हरवर काम करणारी मालती पावरा ही पहिलीच महिला कर्मचारी ठरली आहे. तर, आता वेल्डिंग विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी पूजा सुपेकर व सुवर्णा डोलणार यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

हेही वाचा: तरुण शेतकऱ्याने पिकवला माळमाथ्याच्या मातीत द्राक्षाचा गोडवा

''महिलांच्या कामाचे कौतूक म्हणून व इतर महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या कारखान्यातील अतिरिक्त मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.'' - सतीश केदारे, झोनल सचिव, मनमाड

हेही वाचा: काहीच न करणाऱ्या नगरसेवकांना मतदार दाखवणार घरचा रस्ता | Nashik

loading image
go to top