महागाईच्या निषेधार्थ महिलांचे चूल मांडून आंदोलन | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's agitation to protest against inflation

महागाईच्या निषेधार्थ महिलांचे चूल मांडून आंदोलन

चांदवड (जि. नाशिक) : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने चक्क येथील तहसील कार्यालयासमोरच तीन दगडांची चूल मांडत आंदोलन केले. त्यानंतर तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महागाईच्या निषेधार्थ महिला संघटना आक्रमक

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने देशव्यापी आंदोलन, मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती हॉलमधून निघून चांदवड - मनमाड रस्ता, बाजारतळ, सोमवार पेठमार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुर्ची खाली करा’ अशा घोषणा महिलांनी दिल्या. चांदवड तालुक्यातील बंद पडलेले रेशन कार्ड त्वरित चालू करावे, विधवा परित्यक्ता, दिव्यांग, महिलांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन चालू करणे, तालुक्यातील धनदांडग्या लोकांकडे पिवळे रेशन कार्ड आहेत ते त्वरित बंद करून तालुक्यातील गरजू व गरीब लाभार्थ्यांना ती कार्ड देण्यात यावी, ज्यांच्याकडे शाळेचा दाखला नाही त्या लोकांची नावे मतदार यादीत नोंदवावी आदी मागण्या करण्यात आल्या.

हेही वाचा: नाशिकच्या लेण्यांमध्ये आढळला प्राचीन रोमन खेळाचा पट! | Nashik

तहसील कार्यालयासमोरच तीन दगडांची चूल मांडून आंदोलन करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सचिव सारिका गुंजाळ, तालुकाध्यक्ष ताई पवार यांनी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: रेशन दुकानातून आता चहा-कॉफीचीही विक्री

loading image
go to top