esakal | नाशिक : ‘स्मार्ट’ कामे गेली गोदावरीच्या पुरात वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

work done under nashik smart city was washed away by the flood in godavari river

‘स्मार्ट’ कामे गेली गोदावरीच्या पुरात वाहून

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी ( नाशिक) : कोट्यवधी रुपये खर्च करून स्मार्टसिटीअंतंर्गत गंगा घाटासह शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. परंतु बुधवारी (ता.२९) गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ होताच नदीकिनारी लावण्यात आलेल्या फरशा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी केवळ कच्ची कामे वाहून गेल्याचे सांगत उपाययोजना करत असल्याचे सांगितले.


केंद्र सरकारच्या निधीतून विविध विकासकामे सुरू आहेत. ही कामे सुरू असतानाच गोदेच्या पाणीपातळीत चारवेळा वाढ झाली. त्यामुळे अनेक ठिकाणच्या फरशा निखळून पात्रात वाहून गेल्या. त्यामुळे या कामांच्या एकूण दर्जाबाबतच प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. बुधवारपर्यंत पूरस्थिती असल्याने याबाबत माहिती मिळू शकली नाही, परंतु गुरुवारी पाऊस थांबल्यावर येथे पाहणी केली असता गांधी तलाव परिसर, जुना भाजी बाजार, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण या भागात लावलेल्या फरशांपैकी अनेक निखळून पुरात वाहून गेल्याचे दिसून आले. खरेतर अनेक उपनगरांत अद्यापही रस्ते नाहीत, तर दुसरीकडे चक्क नदीपात्रालगत कामे सुरू असल्याचे विरोधाभासी चित्र आहे.

हेही वाचा: 'भुजबळ भाई विद्यापिठाचे विद्यार्थी नव्हे, प्राचार्य' : सुहास कांदे

कच्ची कामे वाहून गेल्याचा दावा

याबाबत कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता अचानक पाणीपातळी वाढल्यामुळे केवळ कच्ची व नुकतीच केलेली कामे वाहून गेल्याचा दावा त्यांनी केला. फरशांच्या जॉइंटमध्ये जीपी-२ हे केमिकल भरल्यावर त्यावर ॲंकरिंग केले जाते. परंतु पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने हे करणे शक्य झाले नसल्याचे सांगितले. या कामावर दोन वेळेस ट्रीटमेंट करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात कामे कशी?

गोदावरीला दरवर्षी मोठा पूर येतो, याबाबत सर्वच यंत्रणांना माहिती आहे. मग ही परिस्थिती स्मार्टसिटी अधिकाऱ्यांना माहिती नाही का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. केवळ पुरात अशी वाताहत होत असेल तर महापूर आल्यावर काय होईल, याबाबत खरेतर नियोजन हवे. विशेष म्हणजे ऐन पावसाळ्यात नदीकिनारी कामे करणे सयुक्तिक नाही, याकडे जाणकारांनी लक्ष वेधले आहे. गोदावरीला दरवर्षी मोठा येतो. हे शहरातील लहान मुलाला माहीत असेल तर स्मार्टसिटीला त्याबाबत कल्पना कशी नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा: महाराष्ट्राच्या पक्षितीर्थामध्ये वाढला 'पाहुण्यां'चा किलबिलाट

loading image
go to top