esakal | विश्वासू कामगाराने मालकाच्या दुकानातच केली चोरी; दीड लाखाचा ऐवज लंपास 
sakal

बोलून बातमी शोधा

theft 1234.jpg

 कामगाराने सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे एक लाख ६७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (ता. १९) उघडकीस आली. आमीन पठाण यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

विश्वासू कामगाराने मालकाच्या दुकानातच केली चोरी; दीड लाखाचा ऐवज लंपास 

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : कामगाराने सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे एक लाख ६७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (ता. १९) उघडकीस आली. आमीन पठाण यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

कामगाराकडून दीड लाखाचा ऐवज लंपास 

पठाण यांचे कथडा भागात सर्व्हिस स्टेशन आहे. संशयित हुसेन शौकत शेख (रा. कथडा) चार वर्षांपासून त्यांच्याकडे कामास आहे. शनिवारी (ता. १५) संशयित रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या घरी गेला. २० हजारांची गरज असल्याचे सांगितले. पठाण यांनी सोमवारी बँकेतून रक्कम काढून देण्याचे आश्‍वासन दिले. काही वेळानंतर घरातील कपाट उघडे असल्याचे पठाण यांच्या लक्षात आले. कपाटात रोकड व दागिने आढळले नाहीत. संशयिताचाही तपास लागत नसल्याने त्यानेच चोरी केल्याचा संशय बळावला. २७ हजारांची रोकड, एक लाख ४० हजारांच्या दोन सोनसाखळ्या, एक अंगठी आणि एक कर्णफूल असे ३५ ग्रॅमचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली.  

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

loading image
go to top