नाशिक- आयुष्यात मूल किती मोठा झाले, तरी त्याचे लहानपण, सवंगडी, ज्या मातीत वाढला त्या मातीप्रती आस्था यात त्यांच्यात तसूभरही कमी होत नाही. मनाच्या कोपऱ्यात प्रचंड संवेदनशीलता जपली जाते. मुळातच माणूस हा कृतज्ञ प्राणी आहे. याच कृतज्ञतेतून नेहरूनगर शासकीय वसाहतीत वाढलेल्या मुलांनी कामगार वसाहतीप्रति कृतज्ञता म्हणून १ मेस कामगारदिनी स्नेहमेळाव्याचे नियोजन केले आहे.