World Eye Donation Day2020 : कोरोनाच्या काळरात्रीत दडला दृष्टिबाधितांच्या आशेचा किरण!

eyes.jpg
eyes.jpg
Updated on

नाशिक : दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवश्यकता भासते...प्रत्येक गोष्ट बघण्याची क्रिया डोळ्यांनी होते...पण, तेच डोळे कमकुवत किंवा पूर्ण दृष्टीहीन असतील तर काय होईल?...दृष्टिहीनांना सुंदर जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाचे आवाहन करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. दर वर्षी जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे सरासरी दोनशे रुग्णांना बुबुळ प्रत्यारोपण केले जाते. परंतू, गेल्या दोन महिन्यांत एकही नेत्रदान झालेले नाही...

बुबुळ संकलनाचे प्रमाण वाढले

दृष्टिबाधितांच्या जीवनात आशेचा नवीन किरण निर्माण करताना नेत्रदानाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने जागतिक दृष्टिदान दिन 10 जूनला साजरा होतो. गेल्या काही वर्षांमध्ये समाजात नेत्रदानाविषयी वाढलेल्या जागरूकतेतून बुबुळ संकलनाचे प्रमाण वाढलेले आहे. जिल्हा रुग्णालयात दृष्टिबाधितांवर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी प्रदान केली जात असते. बुबुळ संकलनासाठी नेत्रालय, रुग्णालयांची मदत होत असते. विशेषत: मेंदूमृत झालेल्या व्यक्‍तीसह नेत्रदानाची इच्छा नोंदविलेल्या व्यक्‍तींचे बुबुळ जतन करून ठेवले जाते. आवश्‍यकतेनुसार दृष्टिबाधितांवर शस्त्रक्रियेद्वारे बुबुळाचे प्रत्यारोपण केले जाते. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुदेश जगदाळे, डॉ. प्रदीप वाघ यांच्यासह डॉ. आवारे व संपूर्ण विभाग सेवाव्रत आहे. 

कमी-अधिक प्रमाणात वर्षभर सुरळीत नेत्रदान व शस्त्रक्रिया होत असताना गेल्या दोन महिन्यांत मात्र ही संपूर्ण प्रक्रिया प्रभावित झालेली आहे. एकीकडे आरोग्यव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेले असताना गेल्या दोन महिन्यांत नेत्रदानही झालेले नाही. या महिन्यातही नेत्रदानाची शक्‍यता अत्यल्प असल्याने या वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या पहिल्या तिमाहीत एकही शस्त्रक्रिया होणार नसल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.  कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था विस्कळित झालेली असताना नेत्रदानावरही याचा विपरीत परिणाम झालेला आहे. यातून गेल्या दोन महिन्यांत एकही नेत्रदान झालेले नाही. दुसरीकडे बुबुळाच्या (कॉर्निया) प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या 172 वर पोचली आहे. 

वर्षनिहाय कॉर्निया (बुबुळ) संकलन
 
2015- 16-------------207 
2016- 17-------------220 
2017- 18-------------259 
2018- 19-------------248 
2019- 20-------------235  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com