World Sparrow Day : 'त्यांनी' घराच्या गॅलरीलाच बनवले पक्षीघर! पक्ष्यांना निवारा देण्याचा प्रयत्न

Chimney in Aarti Khodke's house on Gangapur Road.
Chimney in Aarti Khodke's house on Gangapur Road.esakal

नाशिक : सिमेंटच्या वाढत्या जंगलासोबत पशू, पक्ष्यांचे अस्तित्व नाहीसे होत असल्याचे अनेकजण सांगत असताना त्यावर उपाय म्हणून नाशिकमधील खोडके कुटुंबाने आपल्या घराच्या गॅलरीतच पक्षीघर साकारले आहे.

या घरात चिमण्यांचा मुक्तसंचार तर आहेच शिवाय बुलबुल, सनबर्ड, पोपट यांसारख्या पक्ष्यांचा मधुर आवाज कानी पडतो. आरती खोडके यांनी साकारलेल्या चिमणीघराची गोष्ट जागतिक चिमणी दिनानिमित्त... (World Sparrow Day aarti khodke made bird house in gallery of house Efforts to provide shelter to birds nashik news)

वाढत्या शहरीकरणामुळे जंगली प्राणी व पशू, पक्ष्यांची घरे उद्‌ध्वस्त होत आहेत. पण शहरात राहूनही त्यांची काळजी घेता येते, हे खोडके कुटुंबाने दाखवून दिले आहे. घराच्या भोवतीच्या परिसरात झाडे लावणे, फ्लॅटच्या गॅलरीत पक्ष्यांसाठी घरटी तयार करून त्यांना खायला देत निसर्गाचे संवर्धन करण्याची किमया आरती खोडके यांनी साधली आहे.

बी.वाय.के. महाविद्यालयात वाणिज्य शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या आरती यांचा हा उपक्रम गेल्या आठ ते दहा वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या गॅलरीत येणाऱ्या पक्ष्यांची संख्या आता वाढली आहे.

गंगापूर रोडला रहिवासी असलेल्या खोडके कुटुंबीयांच्या घरात चिमण्यांपासून सुरवात झाली. आता बुलबुल, सनबर्ड, बारबेट, वेडाराघू, पोपट, साळुंखी, लवपक्षी, कबुतर असे पक्षीघरच तयार झाले आहे. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था त्या नियमितपणे करतात.

चिमण्यांसाठी घरटेही तयार करून या पक्ष्यांना हक्काचा निवारा देण्याचे काम आरती खोडके यांनी केले आहे. पक्षीसंवर्धनाची प्रेरणा त्यांना वडिलांकडून म्हणजेच हृषीकेश खोडके यांच्याकडून मिळाली. निसर्गाच्या संवर्धनासाठी आपल्या परिसरात त्यांनी वृक्षारोपणही केले.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

Chimney in Aarti Khodke's house on Gangapur Road.
MUHS Election : MUHS निवडणूकीची मतमोजणी होणार; 42 केंद्रांवर झाले मतदान

आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन त्या सामाजिक जबाबदारीही निभावत आहेत. आपल्या गॅलरीत येणाऱ्या पक्ष्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकून त्यातून इतरांनी अशीच प्रेरणा घ्यावी, असेही त्यांचे मत आहे.

शहरातील घरे तुलनेने छोटे वाटत असले तरी आपण ठरवले तर पक्ष्यांना छोटासा निवारा देऊ शकतो, असाच हा उपक्रम जागतिक चिमणी दिनानिमित्त प्रेरणादायी म्हणावा लागेल.

"पक्ष्यांना पाणी, खायला अन्न दिले तर त्यांचे संवर्धन योग्य प्रकारे होऊ शकते. आम्ही घराच्या गॅलरीत पक्षीघर साकारले. सद्यःस्थितीला चिमण्यांसह इतर अनेक पक्षी या ठिकाणी येत असतात. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना हे शक्य आहे."

-आरती खोडके, पक्षीप्रेमी, गंगापूर रोड

Chimney in Aarti Khodke's house on Gangapur Road.
Antarnad Program : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने नटला गोदाघाट!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com