
World Water Council : भारतीय आस्थेच्या ‘नीर-नारी-नदी-नारायण' घोषणांनी दुमदुमली जागतिक जल परिषद!
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात पहिली जागतिक जल परिषद ‘दुष्काळ-पूर निवारणाची पद्धत जगाला शिकवण्याचे काम संयुक्त राष्ट्र संघाने करावे', आणि ‘नीर-नारी-नदी, नारायण, नारायण, नारायण' या घोषणांनी दुमदुमून निघाली.
स्थानिक पोलिसांनी घोषणा बंद करण्याची सूचना केली. मात्र या घोषणा कोणत्याही आंदोलनाच्या नाहीत, हा भारतीय आस्थेचा हृदयातील आवाज असल्याचे सांगितल्यावर न्यूयॉर्क पोलिसांना त्याबद्दलची जाणीव झाली. (World Water Council rocked by Nir Nari Nadi Narayan slogans of Indian culture nashik news)
जगातील सर्वात महत्वाच्या संसाधनाच्या दृष्टीकोनातून पाहिली जाणारी ही परिषद असल्याचे प्रतिपादन संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केले. त्यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले. ताजिकिस्तानचे अध्यक्ष रहमोन यांनी प्रास्ताविक केले.
ते म्हणाले, की २०१८-२०२८ च्या आंतरराष्ट्रीय दशकाच्या समाप्तीनिमित्त २०२८ मध्ये दुशान्बेमध्ये तिसरी जलदशक परिषद होईल. पाण्याविषयक प्रयत्नांसाठीच्या कृतीची पावले कशी असू शकतात याची माहिती दिली जाईल.
शेखावत अन डॉ. सिंहांचे नेतृत्व
केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र शेखावत आणि आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतातील ३० प्रतिनिधींचे शिष्टमंडळ जागतिक जलपरिषदेत सहभागी झाले आहे.
न्युयॉर्क पोलिसांनी घोषणा थांबवण्याविषयी सांगितल्यावर डॉ. सिंह म्हणाले, की भारतातील लोक पाणी, स्त्री आणि नदीचा खूप आदर करतात. म्हणून त्याला नारायण म्हणतात. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाण्यावर काम करण्याचा आवाज ऐकू आला.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
भारताचे प्रतिनिधी आणि दुष्काळ-पूर जागतिक लोक आयोगाने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य सचिवांच्या भाषणापासून सुरुवात करत अध्यक्षीय भाषणात १० कलमी ठराव मांडला, असेही डॉ. सिंह यांनी सांगितले. भारतीय शिष्टमंडळातील तेलंगणाचे व्ही. प्रकाश राव, सत्यनारायण बोलिसेट्टी, नरेंद्र चुघ, जयेश जोशी, स्नेहल दोंदे, श्रीकांत, श्वेता झुनझुनवाला, नागमणी जी. यांच्यासह स्वीडनचे आशुतोष तिवारी, चोरलोफोनियाचे इथन, इंग्लंडचे जॅक, ल्युसी आदींचा समावेश होता.
नेदरलँड्सच्या राज्याच्या राजाने नेदरलँड्स आणि ताजिकिस्तान पाण्याद्वारे एकमेकांशी जमीन सामायिक करण्याबद्दल सांगितले. ७७ व्या महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी जल क्रिया प्रतिक्रियात्मक ते सक्रीय करण्यासाठी परिवर्तनात्मक उपायांची मागणी केली.
त्यांनी प्रतिनिधींना विज्ञानावर आधारित, व्यावहारिक आणि एकता असलेल्या उपायांवर विचार करण्यासाठी आमंत्रित केले. इकोसोकचे अध्यक्ष लाचेझारा स्टोएवा यांनी सध्यासह भविष्यात पाण्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करण्याप्रमाणे स्वच्छ पाणी सर्वांसाठी उपलब्ध होण्यासाठी सामील होऊ यात, असे सांगितले.