Nashik | महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले 10 लाखाचे मद्य जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

liquor confiscated

महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले 10 लाखाचे मद्य जप्त

नाशिक : महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित दहा लाख रुपयांचे विदेशी मद्य जप्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक पथकास यश आले आहे. या कारवाईमध्ये पथकाने वाहनासह दहा लाख रुपये किमतीचे विदेशी मद्याचे १०५ बॉक्स जप्त केले.

गुप्त माहीतीद्वारे कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक एकचे दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर १७ नोव्हेंबरला मध्यरात्री पाथर्डी फाटा परिसरात गस्त घालत होते. चारचाकी (एमएच-०९ सीए ५२७६) अडवून त्याची तपासणी केली असता, पथकास एकूण १०५ बॉक्स आढळून आले.

हेही वाचा: नाशिक : कर्मचाऱ्यांच्या वेतनात ठेकेदारांची पाकीटमारी

या वेळी पथकाने अतुल कांबळे (३२, रा. जि. कोल्हापूर), सचिन कांबळे (१९, रा. जि. कोल्हापुर) यांना ताब्यात घेत सर्व साठा जप्त केला. सदरची कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक जयराम जाखेरे, दुय्यम निरीक्षक अरुण सुत्रावे, जवान सुनील दिघोळे, धनराज पवार, एम. पी. भोये, राहुल पवार, अनिता भांड यांनी केली.

हेही वाचा: नाशिक : एसटी कर्मचारी आंदोलनाची धार जिल्ह्यात अद्याप कायम

loading image
go to top