Police Recruitment : नाशिक ग्रामीणच्या पोलिस शिपाई उमेदवारांची 'या' तारखेला लेखी परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Constable

Police Recruitment : नाशिक ग्रामीणच्या पोलिस शिपाई उमेदवारांची 'या' तारखेला लेखी परीक्षा

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिस दलातील पोलिस शिपाई, चालक या पदासाठी मैदानी चाचणी होऊन लेखी परीक्षेच्या प्रतीक्षेत पात्र उमेदवार आहेत.

यातील पोलिस शिपाई चालक (Police Constable Driver) पदासाठीच्या १५ जागांसाठी रविवारी (ता. २६) लेखी परीक्षा आडगाव येथील मेट भुजबळ नॉलेज सिटीत होत आहे. (Written Exam on 26 march for 15 Posts of Police Constable Driver nashik news)

जानेवारी महिन्यात महाराष्ट्र पोलिस दलामार्फत राज्यभर पोलिस भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्याअंतर्गत नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १५ पोलिस शिपाई चालक आणि १६४ पोलिस शिपाई पदासाठीची प्रक्रिया राबविण्यात आली. जानेवारीत मैदानी चाचणी घेण्यात आली होती. मात्र पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेची प्रतीक्षा होती.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

दरम्यान, पोलिस शिपाई चालक पदाच्या मैदानी चाचणी व त्यानंतर चालकाच्या प्रात्यक्षिकानंतर कटऑफनुसार, १२४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यासंदर्भात महाआयटीतर्फे उमेदवारांना ई- मेल व एसएमएसद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, उमेदवारांनी आपले हॉल तिकीट व ओळखपत्र यासह रविवारी (ता.२६) सकाळी साडेसहाला भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.