
Nashik News : बारावी परीक्षा केंद्राबाहेरील झेरॉक्स दुकाने सर्रास सुरू!
नाशिक : बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शहरातील परीक्षा केंद्राजवळ असलेले झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी दिले होते.
मात्र गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेले झेरॉक्स दुकाने सर्रास सुरू होते. (Xerox shop outside 12th examination center open after notice Nashik News)
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
त्यामुळे या व्यावसायिकांनी आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून आहे. परीक्षा केंद्राबाहेर अनावश्यक गर्दी व झेरॉक्स दुकाने सुरू राहिल्यास त्याचा परीक्षार्थींवर विपरीत परिणाम होतो.
परीक्षा कालावधींमध्ये विनाकारण वा अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी जमावबंदीचा आदेश लागू केले आहेत. असे असताना गंगापूर रोडवरील दुकान सुरू राहिल्याने आदेशाचे उल्लंघन झाले. दुसरे असे, की या झेरॉक्स दुकानापासून पोलिस ठाणेही हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे पोलिसांच्याही ही बाब लक्षात आली नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.