
मनसेचे याग्निक शिंदे यांची आत्महत्या
सिडको (नाशिक) : सिडको मनसेचे (MNS) युवा कार्यकर्ते आणि उद्योजक याग्निक शिंदे (वय २८) यांनी गंगापूर रोडवरील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. गत महापालिका निवडणुकीत त्यांनी सिडकोमधून भाजपच्या तिकिटावर उमेदवारी केली होती.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकताच भाजप सोडून मनसेमध्ये प्रवेश केला होता. याग्निक यांचे वडील नंदू शिंदे यांनी गेल्यावर्षी सटाणा येथे आपल्याच गाडीत स्वत:च्या डोक्यावर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. नुकतेच त्यांचे वर्षश्राद्ध झाले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांनीदेखील हे टोकाचे पाऊल उचलल्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. गंगापूर रोडवरील ट्रॅपीकोना इमारतीच्या सी- विंग मधील दहाव्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या सदनिकेत त्यांनी आत्महत्या केली. गंगापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सिडकोमध्ये ही बातमी कळाल्यानंतर शासकीय रुग्णालयात अनेकांनी धाव घेतली.
हेही वाचा: नाशिकमध्ये मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षांचं अकाली निधन
हेही वाचा: 'त्या' शिष्यवृत्तीप्रकरणी खुलासा करा : शिक्षण उपसंचालक
Web Title: Yagnik Shinde Of Mns Nashik Commits Suicide
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..