नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली असून, त्यानुसार १५ सप्टेंबरपर्यंतच्या वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येतील. विविध स्तरांवरील अभ्यासक्रमांसाठी ही मुदतवाढ लागू असेल. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यापीठाने १२ विविध विद्याशाखांच्या १३५ वेगवेगळ्या पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन सुरू केली आहे.