YCMOU Divisional Sports Festival: ‘मुक्‍त’चा रविवारी विभागीय क्रीडा महोत्‍सव

YCMOU
YCMOUesakal

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्रांतर्गत क्रीडा महोत्‍सव होत आहे.

रविवारी (ता.३) सकाळी आठपासून गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या विभागीय क्रीडा महोत्‍सवात नाशिकसह नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. (YCMOU Divisional Sports Festival on Sunday nashik)

YCMOU
Rajya Natya Spardha: सत्य अन् कल्पनेचा खेळ ‘द कॉन्शन्स’

क्रीडा महोत्सवासाठी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, मुक्‍त विद्यापीठाच्‍या निरंतर विद्याशाखेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. जयदीप निकम, विद्यार्थी कल्याण केंद्राचे संचालक डॉ. दयाराम पवार उपस्‍थित राहतील.

क्रीडा महोत्सवात आतापर्यंत पाच जिल्ह्यांतील एकूण १२५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेच्या दिवशी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नाशिक विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्‍लागार व संयोजन समितीचे डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.

या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या केंद्रीय क्रीडा महोत्सवात सहभागी होणार आहेत.

YCMOU
Mahanubhav Sammelan: गुजरातमध्ये 20 डिसेंबरपासून महानुभाव संमेलन : दिनकर पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com