YCMOU News : ‘मुक्त’चा विविध संस्थांशी सामंजस्य करार; कौशल्‍याधिष्ठित अभ्यासक्रमांना होणार सुरवात

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत दूरशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगार संधी देणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वर आधारित अभ्यासक्रमांसाठी नामांकित संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत.
Vice-Chancellor Dr. Yashwantrao Chavan on the occasion of the Memorandum of Understanding with reputed institutions through Maharashtra Open University. Sanjeev Sonwane
Vice-Chancellor Dr. Yashwantrao Chavan on the occasion of the Memorandum of Understanding with reputed institutions through Maharashtra Open University. Sanjeev Sonwaneesakal

YCMOU News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत दूरशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगार संधी देणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वर आधारित अभ्यासक्रमांसाठी नामांकित संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत.

यापूर्वीही विद्यापीठाने विक्रमी सामंजस्‍य करार करताना विद्यार्थ्यांना व्‍यापक संधी उपलब्‍ध करून दिल्‍या होत्‍या. (YCMOU Memorandum of Understanding with various organizations nashik news)

नुकतेच आणखी काही करार करीत विद्यापीठाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. विद्यापीठाने सुपर माइंड फाउंडेशनबरोबर करार केला आहे. यात मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रावरील संशोधनासाठी शिक्षकांना प्रादेशिक भाषेत सारांश विकसित करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार केले जाणार आहे; तर स्किल्स फॅक्टरी लर्निंग प्रा. लि.बरोबरच्‍या करारानुसार सायबर सिक्युरिटी कोर्सेस अवगत केले जातील.

यात यूजीसी अभ्यासक्रमावर आधारित पदवी आणि पदव्‍युत्तर पदवी क्रेडिट आधारित अभ्यासक्रमांचा समावेश असेल. यशस्वी स्किल्स लि.बरोबरच्‍या करारानुसार ‘शिका आणि कमवा’ हा उपक्रम राबविण्यात येईल. माउंट अबू (राजस्थान) येथील राजयोग एज्युकेशन ॲन्ड रिसर्च फाउंडेशन (आरईआरएफ) यांच्‍याबरोबरच्‍या करारातून उच्चशिक्षण आणि संलग्न क्षेत्रातील योग, अध्यात्म आणि मूल्यशिक्षणातील कार्यक्रम प्रदान केले जातील.

यात डिप्लोमा इन व्हॅल्यूज ॲन्ड स्पिरिच्युअल एज्युकेशन (१ वर्ष), अॅडव्हान्स डिप्लोमा इन व्हॅल्यूज ॲन्ड स्पिरिच्युअल एज्युकेशन (२ वर्षे), अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन कौन्सिलिंग ॲन्ड मेंटल हेल्थ (२ वर्षे) हे शिक्षणक्रम राबविणार आहेत.

Vice-Chancellor Dr. Yashwantrao Chavan on the occasion of the Memorandum of Understanding with reputed institutions through Maharashtra Open University. Sanjeev Sonwane
Nashik News : शहरातील संगमेश्‍वर भागातील पाणीपुरवठा तिसऱ्यांदा विस्कळित! पाण्यासाठी स्थानिकांची वणवण

ड्रोन कॉर्पोरेशन प्रा. लि. यांच्‍याबरोबरच्‍या करारानुसार विविध ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील. यात डीजीसीए मंजूर रिमोट पायलट लायसन्स, ड्रोन सिस्टम इंट्रोडक्टरी प्रोग्राम, ड्रोन सिस्टम इंटरमिजिएट प्रोग्रॅम, ड्रोन सिस्टम ॲडवान्स्ड प्रोग्राम आदींचा समावेश असेल.

पाचगणीच्‍या बहाई ॲकॅडमीबरोबरच्‍या करारानुसार शिक्षण समुपदेशक तसेच प्राध्यापकांना अकादमीने तयार केलेल्या मॉड्यूलचा अनुभव घेण्याची आणि नैतिक क्षमता व सहकारी शिक्षण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची संधी असणार आहे. मूल्यशिक्षण, मूलभूत तत्त्वे, प्रगत पदविका अभ्यासक्रमाकडे जाणारा ४-क्रेडिट सर्टिफिकेट कोर्स (ऑनलाइन), ग्लोबल सिटिझन बनणे-ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स हे अभ्यासक्रम इच्छुक विद्यार्थ्यांना शिकविले जातील.

Vice-Chancellor Dr. Yashwantrao Chavan on the occasion of the Memorandum of Understanding with reputed institutions through Maharashtra Open University. Sanjeev Sonwane
Nashik News : वकीलांच्या संरक्षण कायद्यासाठी वकीलांचे धरणे आंदोलन; राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खुनाचाही निषेध

नवी दिल्‍लीच्‍या आरव एज्युकेशनल एम्प्लॉयमेंट रिसर्च ऑर्गनायझेशनबरोबरच्‍या करारानुसार विविध पदविका, अॅडव्हान्स डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम विकसित केले जातील. डिप्लोमा इन फायर टेक्नॉलॉजी ॲन्ड इंडस्ट्रिअल सेफ्टी ऑपरेशन्स, डिप्लोमा इन हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, औद्योगिक सुरक्षेतील ॲडव्हान्स डिप्लोमा, डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल सेफ्टी मॅनेजमेंट आणि इतर विविध शिक्षणक्रम या माध्यमातून सुरू केले जातील. डिस्कव्हर वेलनेस प्रा. लि.च्या सहकार्याने पोषण आणि आहारशास्त्र, आरोग्य आणि निरोगीपणाशी संबंधित अभ्यासक्रमही राबविले जाणार आहेत.

या वेळी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सामंजस्य कराराबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, रोजगाराभिमुख पदवी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध होणार असल्‍याचे सांगितले. राष्ट्रनिर्माणासाठी मनुष्यबळाची निर्मिती या हेतूने हे करार केले आहेत. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, आरोग्य विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम यांनीही मनोगत व्यक्त केले.

अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर यांनी प्रास्ताविक केले. रामेश्वरी पवार यांनी सूत्रसंचालन केले. रियाज पिरजादे यांनी आभार मानले. या वेळी कुलसचिव डॉ. दिलीप भरड, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे आदी उपस्थित होते.

Vice-Chancellor Dr. Yashwantrao Chavan on the occasion of the Memorandum of Understanding with reputed institutions through Maharashtra Open University. Sanjeev Sonwane
Nashik News : संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी राज्यातील उद्योगांची क्षमता तपासणार : डॉ. व्ही. के. राय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com