Nashik News : धरणातील 78 टक्के साठ्यावर वर्षभराचे नियोजन; पाटबंधारे विभागाने मागविली महापालिकेकडून माहिती

gangapur dam
gangapur damesakal

Nashik News : पावसाने दिलेली ओढ व हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार परतीचा पाऊसदेखील पाठ दाखविण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू झाले आहे.

पाटबंधारे विभागाने महापालिकेसह गंगापूर व अन्य धरणांतून विविध संस्थांचे आरक्षण व होणारा पाणीपुरवठा याची माहिती मागविली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होताना दिसत असून, १५ ऑक्टोबरच्या बैठकीत पाणीकपातीचे नियोजन जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे खालच्या धरणांसाठी पाणी सोडण्याची मागणी लक्षात घेऊन लोकप्रतिनिधीदेखील अॅलर्ट मोडमध्ये आले आहे. आधी नाशिकची तहान भागविली जाईल, त्यानंतर खालच्या धरणांमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Year round planning on 78 percent water stock in dam nashik news)

यंदा पावसाने पाठ फिरविल्याने वर्षभर अनेक समस्या निर्माण होणार आहेत. जूनअखेर तुरळक पाऊस पडला. जुलैत राज्यभर मॉन्सून बरसला, परंतु नाशिकमध्ये हवा तसा पाऊस पडला नाही. परतीच्या पावसाच्या चर्चा सुरू असताना नाशिककरांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

धरणांचे आकडे कागदावर फुगलेले दिसत असले तरी प्रत्यक्षात पाण्याचे संकट कायम आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणांत सुरवातीच्या काळात पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीपातळी घसरत आहे. सध्या गंगापूर धरणात ६११ मीटरपर्यंत पाण्याची पातळी स्थिरावली आहे. गंगापूर, कश्यपी व गौतमी असे एकूण धरण समूहात ७९ टक्के पाणीसाठा आहे.

दारणा धरणात ९५ टक्के, मुकणे धरणात ७८ टक्के पाणीसाठा आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडेल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या आठवड्यात पाऊस विश्रांती घेईल.

त्यानंतर परतीचा पाऊस काही प्रमाणात हजेरी लावेल. त्यामुळे यंदा पावसाची तूट कायम राहणार आहे. त्यामुळे धरणांमधील पाण्याचा हिशोब ठेवण्याची तयारी पाटबंधारे विभागाने सुरू केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

gangapur dam
Nashik Temperature Rise : जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ऑक्टोबर हीट’ची मिळणार अनुभूती

नाशिककरांची मोठी अडचण

गंगापूर धरणातून महापालिका किती पाणी उचलते, तसेच औद्योगिक वसाहत, एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन, गंगापूर डाव्या कालव्यातून पाणीवाटप संस्थांना किती पाणी पुरविले जाते, शेती व औद्योगिक कारणासाठी उचलले जाणारे पाणी यासंदर्भातील माहिती महापालिकेकडून मागविण्यात आली आहे.

त्यामुळे आतापर्यंत पडलेला पाऊस पुरेसा समजून नियोजन सुरू झाले असून, यंदा नाशिककरांना दिवाळीपासूनच पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यात समन्यायी पाणीवाटपाचा नियम देखील चिंता निर्माण करू शकतो.

राज्य शासनाच्या मेंढीगिरी समितीच्या समन्यायी पाणीवाटप धोरणात जायकवाडी धरण ६५ टक्के न भरल्यास वरच्या म्हणजे गंगापूर, दारणा, मुळा, प्रवरा, पालखेड, आळंदी व निळवंडे धरणातून पाणी सोडावे, असे २०१३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. समितीच्या अहवालानुसार अंमलबजावणी झाल्यास नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडावे लागल्यास नाशिककरांची मोठी अडचण निर्माण होणार आहे.

प्रक्रियायुक्त पाण्याचाही हिशोब

गंगापूरसह दारणा व मुकणे धरणातून दररोज पाचशे ते ५२५ दशलक्ष लिटर्स पाणी उचलले जाते. उचलल्या जाणाऱ्या पाण्यापैकी किती पाणी मलनिस्सारण केंद्रात पोचते, किती पाण्यावर प्रक्रिया करून नदीमध्ये सोडले जाते, याचा हिशोबदेखील पाटबंधारे विभागाला द्यावा लागणार आहे.

gangapur dam
Shravan Somvar : निसर्गाची आनंदयात्रा... ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा! श्रावणातील तिसऱ्या सोमवारी ऊर्जास्रोत ओसंडणार

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती

गंगापूर धरण समूह

धरण क्षमता (दशलक्ष घनफूट) साठा (कंसात टक्केवारी)

गंगापूर ५६३० ५१४० (९१)

कश्यपी १८५२ ११५८ (६२)

गौतमी १८६८ १०९१ (५८.४०)

एकूण ९३५० ६८५३ (७९.०३)

दारणा ७१४९ ६८०९ (९५.२४)

मुकणे ७२३९ ५६५३ (७८.०९)

पाण्याचे आरक्षण (दशलक्ष घनफूट)

धरण आरक्षण

गंगापूर ४४००

दारणा १००

मुकणे १६००

६१००

gangapur dam
Nashik Electricity News : पावसाअभावी विजेचे संकट गडद; मागणी 27 हजार 500 मेगावॉटवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com