येवला: जनता नागरी सहकारी पतसंस्थेत चुकीची आर्थिक पत्रके करतानाच ठेवीदार व सभासदांची फसवणूक करून ठेवी परत न दिल्याप्रकरणी संस्थापकासह सहसंचालकांवर तीन वर्षांपूर्वी गुन्हे दाखल आहेत. यातील मुख्य संशयित संस्थापक दौलतराव ठाकरे यांना पोलिसांनी बोईसर येथून अटक केली. तीन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता.