Yeola Ganeshotsavsakal
नाशिक
Yeola Ganeshotsav : ऐतिहासिक देखावे पाहण्यासाठी येवल्यात भाविकांची गर्दी; गणेश मंडळांचे सामाजिक आणि पौराणिक देखावे ठरले आकर्षण
Yeola’s Unique Ganeshotsav Traditions : ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक विषयांवरील हलते व सजीव देखावे सादर करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली असून, यंदा देखाव्याची संख्या वाढली आहे. दरम्यान, देखावे पाहण्यासाठी रोज भाविकांची गर्दी होत असून, रात्री गल्ली गर्दीने फुलत आहेत.
येवला: उत्सवप्रिय असलेल्या येवल्याची गणेशोत्सवाची मिरवणूक, मानाची परंपरा व त्यातील देखाव्यातील वेगळेपण नवी पिढीही जपत आहे. येथे ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक विषयांवरील हलते व सजीव देखावे सादर करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली असून, यंदा देखाव्याची संख्या वाढली आहे. दरम्यान, देखावे पाहण्यासाठी रोज भाविकांची गर्दी होत असून, रात्री गल्ली गर्दीने फुलत आहेत.