esakal | येवल्यात कोरोनाचा धुमाकूळ; तालुक्यातील ३०च्यावर गावे हॉटस्पॉट!

बोलून बातमी शोधा

Corona
येवल्यात कोरोनाचा धुमाकूळ; तालुक्यातील ३०च्यावर गावे हॉटस्पॉट!
sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरात रोजच रुग्ण आढळत होते. दुसऱ्या लाटेत मात्र शहर कंट्रोलमध्ये असले तरी ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ चालवला आहे. तालुक्यातील ३० वर गावे हॉटस्पॉट बनली असून, रोजच वाढत्या रुग्ण संख्येसह मृत होणाऱ्यांची संख्याही वाढल्याने चिंतेत भर पडत आहे. सध्या शहरातील केवळ ५८ रूग्ण असून, ग्रामीण भागात मात्र ४८४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. शेजारील तालुक्‍यांच्या तुलनेत येथील आकडेवारीचा विस्फोट झाला नसला तरी ग्रामीण भागातील वाढणारे आकडे चिंतेचा विषय ठरत आहेत.

अनेक गावे हॉटस्पॉट बनली आहे

आतापर्यंत तालुक्‍यात ३ हजार ६०५ एकूण रुग्ण सापडले असून, यातील २ हजार ४६५ रुग्ण एकटे ग्रामीण भागातील तर १ हजार १४० शहरातील आहे. पहिल्या लाटेत बोटावर मोजण्या इतक्या गावातच ग्रामीण भागात रुग्ण आढळले होते. आता दुसऱ्या लाटेत मात्र ग्रामीण भागातील अनेक गावे हॉटस्पॉट बनली आहे. गंभीर म्हणजे दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाणही वाढले असून, यात ग्रामीण भागातील ९८ तर शहरातील ४२ जणांनी आपले जीव गमावले आहेत. शहरातील उपजिल्हा रुग्णालय, बाभूळगाव व नगरसूल येथे शासकीय कोविड केअर सेंटर असून, याठिकाणी सुमारे १६५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर, गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या ३६० च्या वर आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये रेमडेसिव्‍हिरचा पुन्हा काळाबाजार; पाच इंजेक्शनसह वॉर्डबॉय गजाआड

गावनिहाय आकडेवारी (कंसात ॲक्टीव्ह रुग्ण)… गावनिहाय आकडेवारी (कंसात ॲक्टीव्ह रुग्ण)…

सर्वात अधिक रुग्ण अंदरसूलमध्ये आहे. आतापर्यंत २१२ (ॲक्टिव्ह २४) रुग्णांची नोंद आहे. अंकाई ५४ (११), बोकटे ३३ (१४), अनकुटे २४, अंगुलगाव, २८ (७), भारम २४, महालखेडा १९ (१०), बदापूर १६, चिचोंडी ३७ (१३), चिचोंडी बुद्रुक १८, देशमाने १६ (४), धामोडे २० (५), एरंडगाव बुद्रुक १९ (२), जळगाव नेऊर २७ (६), कातरणी ४७ (५), खिर्डीसाठे २४ (८), कुसमाडी ३० (९), कुसुर २५ (२), ममदापूर १७ (७), मातुलठाण ३२ (६), मुखेड ६७ (१५), पारेगाव ३२ (१), पाटोदा ११६ (१७), पिंपळखूटे बु॥ १८ (९), पिंपळगाव लेप २२ (३), राजापूर ५६ (६), सत्यगाव ३६, सावरगाव ६६ (९), सायगाव ६४, शिरसगाव लौकी ३६ (५), सोमठाणदेश ४०(९), विसापूर २१ (५), कोळगाव १६ (४), धुळगाव ३२ (१२), ठाणगाव २० (३), गुजरखेडा २४, जऊळके १९ (७) रुग्ण आढळले आहेत. गंभीर म्हणजे अंदरसूल, राजापूर, नगरसूल, धुळगाव, चिचोंडी आदी गावात मृत्यूची संख्याही वाढत आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागात चिंता वाढली असून, अनेक जण आता वेळ निघून गेल्यावर काळजी घेत असल्याचे चित्र आहे.

असे आहेत आकडे…

ग्रामीण भागातील सर्व गावे मिळून आतापर्यंत ४ हजार २१८ संशयित आढळले असून, यातील २ हजार ४६५ पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर शहरामध्ये आतापर्यंत तीन हजार ६८४ संशयितापैकी १ हजार १४० जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. एकूण सात हजार ९०२ संशयित आतापर्यंत आढळले आहेत. ग्रामीण भागातील १ हजार ८८३ तर शहरातील १ हजार ४० जण असे २ हजार ९२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, आज पुन्हा ८३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत ५४२ जण कोरोनावर उपचार घेत असून, यातील ३६० जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य सहाय्यक राजेंद्र खैरे यांनी दिली.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

"रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी. योग्यवेळी उपचार झाल्यास कोरोना निश्‍चित बरा होतो. म्हणून प्रत्येकाने न घाबरता लक्षण आढळून आल्यास आणि कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह असल्यास त्वरित चाचणी करून घेणे गरजेचे आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीने स्वतः विलगीकरणात राहिले पाहिजे. परीसरातील ग्रामस्थांचे लसीकरणासाठी त्वरित शिबिर घेण्याची मागणी केली आहे. सर्वांनी एकोप्याने या आपत्तीवर मात करू.''

- महेंद्र काले, सदस्य, जि. प., अंदरसूल