Grape Farmer
sakal
नाशिक
Yeola News : मेहनत मातीमोल! फुलोरा न लागल्याने पाटोदा येथील शेतकऱ्याने दोन एकर द्राक्षबाग तोडली; शासनाने लक्ष देण्याची मागणी
Unseasonal Rains Shatter Farmers’ Dreams in Yeola : येवला तालुक्यातील पाटोदा येथील शेतकरी सोमनाथ घोरपडे यांनी अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे फुलोरा न लागलेल्या आपल्या दोन एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवून निसर्गाच्या अन्यायाविरोधात आपला संताप व्यक्त केला.
येवला: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची स्वप्नंच भिजवली आहेत. चार महिन्यांच्या मेहनतीनंतरही द्राक्षबागांना फुलोरा न लागल्याने, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची उमेद गळून पडली आहे. पाटोदा येथील शेतकरी सोमनाथ घोरपडे यांनी अखेर निराशेच्या भरात स्वतःच्या दोन एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवत निसर्गाच्या अन्यायाविरोधात टोकाचा निर्णय घेतला.
