YIN College Election: ‘यिन’ महाविद्यालयीन निवडणूक मतदार नोंदणी अभियानाला सुरवात! अशी करावी नावनोंदणी

‘यिन’ नेतृत्व विकास कार्यक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा; महाविद्यालयातूनच नव्या युवा चेहऱ्याला मिळणार संधी
YIN Ministry
YIN Ministryesakal

YIN College Election : नाशिक ‘यिन’च्या नेतृत्वविकास कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयीन निवडणुकीपूर्वी मतदान नोंदणी अभियानाला सोमवार (ता. २०)पासून सुरवात झाली.

हे अभियान येत्या ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान यादीत आजच नावनोंदणी करावी, असे आवाहन ‘यिन’ व्यासपीठातर्फे करण्यात आली आहे. (YIN College Election Voter Registration Campaign Begins nashik)

जानेवारीत होणाऱ्या ‘यिन’च्या निवडणूक प्रक्रियेचा भाग होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी स्वत:च्या विजयासाठी महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये ‘यिन’चे ॲप डाउनलोड करून जास्तीत जास्त ऑनलाइन मतदान नावनोंदणी करून घ्यावी.

विद्यार्थिदशेतून नेतृत्व विकासाला यातून गती मिळणार आहे. सर्व उपक्रमाची माहिती ‘यिन’च्या ॲपवर उपलब्‍ध करून दिली आहे.

ऑनलाइन नावनोंदणी पुढील प्रकारे करता येईल.

• सर्वांत प्रथम ॲप डाउनलोड करा.

• ‘यिन’चे अॅप आधीच डाउनलोड केले असेल, तर अपडेट करा.

• जर तुम्ही जुने सदस्य असाल, जुन्याच मोबाईल क्रमांकाने लॉगिन करावे. त्या वेळचा पासवर्ड आठवणीत नसेल, तर फरगॉट पासवर्ड करावा.

• जर तुम्ही जुने सदस्य नसाल, न्यू मेंबरवर क्लिक करून नवीन खाते तयार करावे.

• नवीन खाते बनवताना त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.

• मतदारांनी नावनोंदणी करताना तुम्ही आता शिकत असलेल्या विद्यालयाचे अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र, आधारकार्ड आणि स्वत:चा फोटो अपलोड करावा.

• वरील कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ती कागदपत्रे पडताळताना काही चुकीची कागदपत्रे आढळली, मतदारकार्ड पेंडिंग असे दाखवेल. अशा वेळी सुधारित कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्यासाठी लिंक येईल, त्यात अपलोड करावे.

• तरीही नाही झाल्यास जिल्हा यिन अधिकाऱ्यांशी संपर्क करून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मतदानकार्ड अप्रूव्ह करून घेणे.

• ॲपमध्ये गेल्यावर ‘एलडीपी’ या टॅबमध्ये जावे. या टॅबमध्ये गेल्यानंतर ‘व्होटर रजिट्रेशन’मधील राहिलेली माहिती भरावी. या प्रक्रियेनंतरच आपली मतदार म्हणून नावनोंदणी पूर्ण होईल.

• मतदारांची वयोमर्यादा अकरावीपासून पुढे म्हणजेच १६ ते २५ वयापर्यंत आहे.

वरील नवीन मतदार नोंदणीसाठी काही अडचण आल्यास स्थानिक ‘सकाळ’ कार्यालयाशी, जिल्हा ‘यिन’ अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. मतदान नावनोंदणीसाठी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा, असे आवाहन केले आहे.

YIN Ministry
Pandit Dindayal Upadhyay Maharojgar Melawa: नागपूरच्या रोजगार मेळाव्‍यात सहभागाचे आवाहन
QR Code
QR Codeesakal

प्राचार्य म्‍हणतात...

"महाविद्यालयीन युवकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘यिन’ निवडणूक प्रभावी माध्यम आहे. यातून लोकशाही बळकट होण्यास मदत होईल. तसेच महाविद्यालयीन युवकांमधून नवीन नेतृत्व घडण्यासदेखील मदत होणार आहे."

- डॉ आर. डी. दरेकर, प्राचार्य, मविप्र केटीएचएम महाविद्यालय, नाशिक

"आजचे विद्यार्थी भविष्यातील सुजाण आहेत. प्रत्‍येकाला आपल्‍या कर्तव्‍याची जाणीव करून देताना लोकशाहीची मूल्‍ये रुजविणारा ‘यिन’चा उपक्रम स्‍तुत्‍य आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणीला प्रतिसाद द्यावा."

- डॉ. एस. बी. बागल, प्राचार्य, सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालय, अंजनेरी, नाशिक

"महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत सामाजिक जाणीव रुजविण्यासाठी, त्‍यांच्‍या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘यिन’ विविध उपक्रम राबविते. नेतृत्व विकासाचा भाग म्‍हणून येणाऱ्या निवडणुकांच्‍या प्रक्रियेत सहभागी होत विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्‍क बजवावा."

- डॉ. दीपक पाटील, प्राचार्य, संदीप अभियांत्रिकी महाविद्यालय, महिरावणी, नाशिक

"महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून विविध क्षेत्रांतील नेतृत्व निर्माण होऊ शकते. त्‍यासाठी युवकांमधील आत्‍मविश्‍वास वृद्धिंगत करणे आवश्‍यक आहे. ‘यिन’ नेतृत्त्वविकास कार्यक्रमातून हा उद्देश साधला जात आहे. विद्यार्थ्यांनी मतदानातून योग्‍य नेतृत्वाची निवड करावी."

- डॉ. बापूसाहेब जगदाळे, प्राचार्य, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी

"ग्रामीण भागातील मुलांमधील न्यूनगंड घालविताना त्‍यांच्‍यात आत्‍मविश्‍वास निर्माण केल्‍यास ते जगाशी स्‍पर्धा करू शकतात. ‘यिन’च्‍या माध्यमातून मिळत असलेली प्रतिनिधीत्वाची संधी विद्यार्थ्यांनी साधावी. मतदानाचा हक्‍क बजावताना चांगले प्रतिनिधी निवडावेत."

- डॉ. डी. एन. शिंपी, प्राचार्य, एसएनजेबी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदवड

YIN Ministry
Holiday 2024: नोकरदार वर्गाला पुढील वर्षी मिळणार सुट्यांची मेजवानी! सुट्यांचे शतक पूर्ण करण्याची संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com