esakal | YIN अधिवेशन : माध्यमांच्‍या योग्‍य वापरातून समाजापर्यंत पोहचा, प्रसन्न जोशींचे प्रतिपादन
sakal

बोलून बातमी शोधा

yin convension

YIN : माध्यमांच्‍या योग्‍य वापरातून समाजापर्यंत पोहचा

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : सामाजासाठी उपक्रम राबवत असतांना, केलेले कार्य लोकापर्यंत पोहचविणेदेखील कौशल्‍यांचा भाग आहे. भ्यासपूर्ण भुमिका मांडायला हवी. विचारात स्‍पष्टपणा असाण्यासोबत प्रयत्‍नांमध्ये सातत्‍य असावे. प्रचलित माध्यमे, सोशल मिडीया यांच्‍यातून तरुणाईने व्‍यक्‍त होत असतांना या माध्यमांचा योग्‍य वापर करत समाजापर्यंत पोहचावे, असे प्रतिपादन 'साम'चे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी आज (ता.31) येथे केले. (YIN-Convention-2-day-prasanna-joshi-talked-about-media-marathi-news-jpd93)

'सकाळ' उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी घेतली मुलाखत

'सकाळ माध्यम समूहा'च्या 'यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क' (यिन) तर्फे यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठात होत असलेल्‍या अधिवेशनातील सत्रात ते बोलत होते. 'सकाळ'च्‍या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी जोशी यांची मुलाखत घेतली. जोशी म्‍हणाले, की स्‍वतःची योग्‍य प्रसिद्धी करणे यात वावगे काहीच नाही. चांगले प्रयोग करतांना, ते समाजापर्यंत पोहचविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वक्‍तृत्त्व ही एकप्रकारे साधना असून, संदर्भसूचकता असणेही महत्त्वाचे आहे. मुद्देसूद मांडणी करायची असेल तर त्‍यासाठी भरपुर वाचन करावे, चांगले कार्यक्रम ऐकले पाहिजे. स्‍वतःसोबत बोलण्याची तयारी करतांना, संधी मिळेल तिथे भुमिका मांडावी. त्‍यासाठी वृत्त वाहिन्यांमध्ये प्रतिक्रीयांसह फेसबुक लाईव्‍ह व अन्‍य साधनांचा वापर करावा, असा सल्‍ला जोशी यांनी दिला.केवळ केलेल्‍या कामांचे छायाचित्र पोस्‍ट करणे म्‍हणजे सोशल मिडीया हाताळणे असे नाही. तर अशा माध्यमांमध्ये पोस्‍ट केलेल्‍या कंटेंटमध्ये तितकी क्षमता असावी. सोशल मिडीयावर व्‍यक्‍त होतांना संवेदनशिलता लक्षात भान राखले पाहिजे. अन्‍यथा अडचणीत सापडण्याची शक्‍यता असते, असे त्‍यांनी नमूद केले.

'टूल किट'ला बदनाम कराला नको

सोशल मिडीयाचा शास्‍त्रोक्‍त पद्धतीने वापर 'टूल किट'च्‍या माध्यमातून केला जात असल्‍याने, या संकल्‍पनेला बदनाम करायला नको. 'एमपीएससी'चा उमेदवार स्‍वप्‍नील लोणकर याच्‍या घटनेसंदर्भात 'साम'वर वार्तांकन करतांना हॅशटॅकसह अन्‍य माध्यमातून हा मुद्दा उचलून धरला. दुसर्या दिवशी अधिवेशनात ओबीसींच्‍या विषयावर चर्चा अपेक्षित असतांना, एमपीएससीविषयावर चर्चा पार पडली. अनेक महत्त्वाचे निर्णय जाहिर करण्यात आले. या उदाहरणातून संकल्‍पनेचे महत्त्व स्‍पष्ट होते.

हेही वाचा: PHOTO : 'यिन' अधिवेशनाला दिमाखात सुरवात!

लोकप्रतिनिधी, शासनाकडून हव्‍यात उचित अपेक्षा

नगरसेवकांपासून आमदार, खासदारांपर्यंत सर्वांकडून आपल्‍याला चांगले रस्ते व पायाभुत सुविधांसंदर्भातील अपेक्षा असतात. अनेक ठिकाणी विकास होत नसतांनाही राजकीय बदल घडत नसल्‍याचा अर्थ अशा क्षेत्रात लोकांनाच बदल नको आहे. दुसरीकडे शासनाकडून नोकरी भरतीसंदर्भात मोठ्या अपेक्षा लागून असतात. सदासर्वकाळ नोकरी उपलब्‍ध करणे शक्‍य नसल्‍याची वस्‍तुस्‍थिती आहे. वास्‍तव स्‍विकारत नवीन मार्गांचा शोध घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधी, शासनाकडून उचित अपेक्षा ठेवण्याचा सल्‍ला श्री.जोशी यांनी तरुणाईला दिला.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील निर्बंध तूर्तास 'जैसे थे' : छगन भुजबळ

loading image
go to top