Rajesh Pandit of Namami Goda Foundation, Dr.Ratnakar Ahire, Mahendra Mahajan, Rutendra Nagara, Srikanth Shukla, Dr.Narendra Telrandhe etc. were present while speaking in the district level convention.
Rajesh Pandit of Namami Goda Foundation, Dr.Ratnakar Ahire, Mahendra Mahajan, Rutendra Nagara, Srikanth Shukla, Dr.Narendra Telrandhe etc. were present while speaking in the district level convention.esakal

YIN District Convention : सामाजिक जाणिवा अन्‌ व्यक्‍तिमत्त्‍व विकासाचा जाणला मूलमंत्र!

नाशिक : जागतिक स्‍तरावर पाणी कमवण्यासाठी सुरू असलेल्‍या चळवळीची माहिती जाणून घेताना, निर्माण झालेली सामाजिक जाणीव... आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्‍तरावरील तज्ज्ञांच्‍या मार्गदर्शनामुळे व्यक्‍तिमत्त्‍व विकासाचा मिळालेला मूलमंत्र अन् लोकशाही मार्गाने विविध पदांसाठी केलेली निवड...

अशा उत्‍साहवर्धक वातावरणात ‘यिन मिनिस्‍ट्री’ अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय अधिवेशन झाले. अशोका बिझनेस स्‍कूलमध्ये झालेल्या अधिवेशनात जिल्ह्यातील ‘यिन’ पदाधिकारी सहभागी झाले होते. (YIN District Convention key to social awareness and personality development nashik news)

दक्षिण आफ्रिकेतील ॲनसिएन्ट व्हिस्डम फाउंडेशनच्या रुतेंद्रो नगारा, अशोका एज्‍युकेशन फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्‍ल, ‘ॲडमिनिस्‍ट्रेटर’ डॉ. नरेंद्र तेलरांधे, आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी व्‍याख्याते डॉ. रत्‍नाकर अहिरे, नमामि गोदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित आदी उपस्‍थित होते.

श्री. तेलरांधे म्‍हणाले, की विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्‍व करताना पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. वैचारिक प्रगल्‍भता ठेवतांना आपली छाप पाडावी. अगदी संसंदेत प्रतिनिधित्‍व करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी.

अशोका बिझनेस स्‍कूलच्‍या संचालिका डॉ. सरिता ढवळे म्‍हणाल्‍या, की शैक्षणिक संकुलात अधिवेशन भरवताना पदाधिकाऱ्यांनी चांगला प्रतिसाद नोंदवला. अधिवेशनातील चर्चेचा भविष्यात उपयोग करून घ्यावा.

‘यिन’ नाशिक विभागाचे अधिकारी गणेश जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. अंजना भंडारी यांनी सूत्रसंचालन केले.

Rajesh Pandit of Namami Goda Foundation, Dr.Ratnakar Ahire, Mahendra Mahajan, Rutendra Nagara, Srikanth Shukla, Dr.Narendra Telrandhe etc. were present while speaking in the district level convention.
Nashik News: पुनर्नियोजनातील अतिरिक्त प्रशासकीय मान्यतेला ब्रेक? कांदेंच्या तक्रारीनंतर ZP प्रशासन बॅकफुटवर

अध्यक्षपदी भालेराव, विरोधी पक्षनेतेपदी झोपे

‘यिन’ शॅडो कॅबिनेटतंर्गत अधिवेशनासाठी अध्यक्ष म्‍हणून वैभव भालेराव, उपाध्यक्ष म्‍हणून वेदिका शिवले यांची मतदानाने निवड झाली. विरोधी पक्षनेतेपदी आदित्‍य झोपे आणि उपनेतेपदी नुपूर मोहिते यांची निवड केली.

उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख म्‍हणून महापौर असलेल्‍या वेदांत सोनवणे, तर उत्तर महाराष्ट्रासाठी राज्‍य संपर्कप्रमुख पदासाठी विशाल मते यांची निवड झाली. तालुका संपर्क प्रमुखपदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्‍या.

त्यामध्ये शहाबाज शेख (येवला), संकेत निर्मळ (सिन्नर), अमोल गांगुर्डे (निफाड), दीपतेश पाटील (चांदवड), मालेगावचा महापौर अशुतोष पवार (मालेगाव), निकेतन कापडणीस (सटाणा), देवेंद्र गावित (कळवण), यश पवार (त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी), युवराज पगार (पेठ व सुरगाणा), रोहित जगताप (नाशिक), वेद पाटील (नांदगाव), कृष्णा सरोदे (ओझर), महेश तांबडे (दिंडोरी) यांचा समावेश आहे. नाशिक तालुक्‍यासाठी उपसंपर्क प्रमुखपदी ऋषी पांडे याची निवड केली.

‘यिन’ शॅडो कॅबिनेटमधील संसदीय कामकाजमंत्री उन्मिल सानप, महसूलमंत्री वेदांत बच्‍छाव आणि शालेय शिक्षणमंत्री दर्शन देवरे यांनी सहभागी होत संवाद साधला. ‘यिन’ पदाधिकारी राहुल पाटील, प्रांजल दिवाकर, शाहाबाज शेख, वेदिका यांचा विशेष सन्मान झाला.

मानवी अस्‍तित्‍व टिकविण्यासाठी पाण्याचे महत्त्‍व ओळखावे : नगारा

आफ्रिका खंडातील चार प्रमुख नद्यांशी निगडित वेगवेगळी आव्‍हाने निर्माण झाली आहेत. पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे मानवी अस्‍तित्‍व टिकवायचे असल्यास पाण्याचे महत्त्‍व वेळीच ओळखत संवर्धनासाठी प्रयत्‍न होणे आवश्‍यक असल्‍याचे रुतेंद्रो नगारा यांनी सांगितले.

पाणी हा जागतिक स्‍तरावरील जटिल विषय असून, या समस्‍येच्‍या सोडवणुकीसाठी युवकांनी पुढाकार घेत ठोस उपाययोजना सुचविण्याचे आवाहन त्‍यांनी केले.

Rajesh Pandit of Namami Goda Foundation, Dr.Ratnakar Ahire, Mahendra Mahajan, Rutendra Nagara, Srikanth Shukla, Dr.Narendra Telrandhe etc. were present while speaking in the district level convention.
Nashik News : गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांचा मंगळवारी दिल्लीत मोर्चा!

युवकांनी ठरविलेल्‍या धोरणांनी आपले भविष्य उज्‍ज्‍वल : पंडित

वायू व जल या दोन घटकांवर मानवी अस्‍तित्‍व टिकून आहे. आजच्‍या युवा पिढीमध्ये सजगता व संवेदनशीलता आहे. त्‍यामुळे निर्णयाच्‍या प्रक्रियेत सहभागी होत युवाशक्‍तीने ठरवलेले धोरण देशाच्‍या भविष्यासाठी उज्‍ज्‍वल ठरतील, असा विश्‍वास श्री. पंडित यांनी व्‍यक्‍त केला.

नदी ही शहरातील रक्‍तवाहिनी असून, दूषित नदीचे गंभीर परिणाम शहरवासीयांवर होतात. त्‍यामुळे आपल्‍या परिसरातील नदी स्‍वच्‍छ ठेवण्यासाठी प्रत्‍येक नागरिकाने सजग राहाणे आवश्‍यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

व्‍यापक दृष्टिकोनामधून घडवा करिअर : शुक्‍ल

नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय स्‍तरापासून कौशल्‍याधीष्ठित शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित आहे. बदलत्या काळानुरूप करिअरच्‍या पर्यायांची व्‍याप्ती वाढली आहे. पारंपरिक वर्तुळाबाहेर जाऊन खूप मोठे जग अस्‍तित्‍वात आहे.

त्‍यामुळे युवकांनी व्‍यापक दृष्टिकोन ठेवून आपले करिअर घडवावे, असा सल्‍ला श्री. शुक्‍ल यांनी दिला. आपल्‍या आवडी-निवडीबाबत पालकांशी मोकळेपणाने व अभ्यासपूर्ण संवाद साधावा, असेही त्‍यांनी नमूद केले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Rajesh Pandit of Namami Goda Foundation, Dr.Ratnakar Ahire, Mahendra Mahajan, Rutendra Nagara, Srikanth Shukla, Dr.Narendra Telrandhe etc. were present while speaking in the district level convention.
Rupali Chakankar | राज्य पतसंस्था फेडरेशनकडून पतसंस्थांचे बळकटीकरण : रूपाली चाकणकर

आत्‍मविश्‍वास, सकारात्‍मकतेने जीवन जगा : डॉ. रत्नाकर अहिरे

दुसऱ्यांसोबत तुलना करून अथवा नकारात्‍मक विचारांनी आयुष्यात केवळ दुःख मिळू शकते. याउलट आत्‍मविश्‍वास व सकारात्‍मक दृष्टिकोनातून जीवन जगल्‍यास कुठल्‍याही आव्‍हानाला तोंड देणे सुलभ होते, असे मत डॉ. रत्‍नाकर अहिरे यांनी व्यक्त केले.

तसेच कुठल्‍याही कामातून आनंद, शांतता मिळणे अपेक्षित असते. जर आपण प्रसन्न होऊन काम केले, तर इच्‍छिक प्रगती साधता येऊ शकेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

सामाजिक कार्यात नोंदवा सक्रिय सहभाग : गायकवाड

तरुणांनी आपल्‍यातील ऊर्जेचा सामाजिक कार्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. आमच्‍या संस्‍थेच्‍या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जात असून, सदस्‍यांनी सहभागी होतांना रोप दत्तक घेऊन ते जगविण्यासाठी योगदान द्यावे, असे निर्मल फाउंडेशनच्‍या डॉ. शीतल गायकवाड यांनी सांगितले.

Rajesh Pandit of Namami Goda Foundation, Dr.Ratnakar Ahire, Mahendra Mahajan, Rutendra Nagara, Srikanth Shukla, Dr.Narendra Telrandhe etc. were present while speaking in the district level convention.
Chhagan Bhujbal | नाशिकला निओ मेट्रो नव्हे मेट्रोची गरज : छगन भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com