
Nashik : शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट; तरुणास अटक
नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्टिव (Tweet) करणाऱ्या एका तरुणास नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीसांनी दिंडोरीमधून ताब्यात घेत अटक केली आहे. निखिल भामरे असे त्याचे नाव असून त्याचा मोबाईल देखील पोलीसांनी जप्त केला आहे. (young boy was arrested for making Offensive tweet against NCP Chief Sharad Pawar Nashik News)
मूळ सटाणा तालुक्यातील असलेला आणि दिंडोरी येथे शिक्षण घेत असलेल्या निखिल भामरे याने ११ मे रोजी सायंकाळी 'वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची' असा मजकूर ट्विट केला. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, काय पातळी वर हे सगळे होते आहे. या विकृत तरुणा विरुद्ध कडक कारवाई करा अशी मागणी मुंबई, महाराष्ट्र पोलिस महासंचालक, पुणे आणि ठाणे पोलीसांना ट्विट करत केली.
हेही वाचा: नाशिक : धावत्या बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने 30 प्रवासी बचावले
यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांच्या सूचनेवरुन निखिल भामरे याचा शोध घेत त्यास दिंडोरीमधून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्याचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला असून त्याच्या मोबाईलमध्ये देखील अनेक आक्षेपार्ह मजकूर पोलीसांच्या हाती मिळाला आहे.
हेही वाचा: नाशिक : 'महानगर गॅस' कंपनीला महापालिकेकडून दणका
"निखिल भामरे या तरुणास दिंडोरीतून पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. त्याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह मजकूर देखील मिळाला आहे. निखिल हा मूळचा सटाणामधील असून तो शिक्षणासाठी दिंडोरीत होता. याप्रकरणी आणखी तपास केला जात आहे. निखिल यास रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे."
- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण
Web Title: Young Boy Was Arrested For Making Offensive Tweet Against Ncp Chief Sharad Pawar Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..