तरूण शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसायाकडे कल; मिळवताय भरघोस नफा

Dairy
Dairyesakal

अंबासन (जि. नाशिक) : आपल्या कल्पकतेच्या बळावर स्वतःचा दुग्धव्यवसाय सुरू करीत येथील युवकाने स्वप्नांना पंखांचे बळ दिले आहे. परिसरातील शेतीला जोड- व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे (Dairy business) पाहिले जाते. दोन वर्षांपासून गावात सुरू झालेल्या दुध डेअरीमुळे शेतकऱ्यांचा कल वाढला तसेच अमूल्य वेळ वाचत असल्याने फायदेशीर ठरत आहे. 

5 लिटर पासून सुरूवात आता उलाढाल चारशे लिटर

गाव व परिसरात दुभती जनावरे बहुतांश शेतकऱ्यांकडे आहेत. बरेच शेतकरी गावात दुधाची विक्री करीत असत तर काही नामपूर, वडणेर-खाकुर्डी तसेच इतर खेड्यापाड्यांत विक्री करीत होते. मात्र यामुळे वेळ जात असल्याने शेतीकामांवर उशिरापर्यंत काम होत नव्हते. दुग्धव्यावसायिक दादाजी आहिरे यांनी शेतीतून पहाटे थेट डोक्यावर दुधाची कॅन घेऊन अंबासन-नाशिक बसने नामपूर शहरात पोहचवत होते. येथील युवा शेतकरी चंद्रकांत कोर यांच्याकडे वडिलोपार्जित जनावरे आहेत. गावातून दुध विक्री करीत असतानाच विजय जिभाऊ कोर यांनी दुग्धव्यवसाय करण्यासाठी दुध डेअरीची संकल्पना सुचविली त्याप्रमाणे चंद्रकांत यांनी बसस्थानक परिसरातील त्यांच्या खळवाडीजवळ घरच्याच म्हशींचे पाच लिटर दुधाची कॅनमध्ये दुध विक्रीसाठी ठेवले. सुरूवातीला काही दिवस कठीण गेले असल्याचे चंद्रकांत यांनी सांगितले मात्र हळुहळु गावातून प्रतिसाद मिळत गेला. गेल्या तीन वर्षांपासून तब्बल चारशे ते साडेचारशे लिटर दूध गावातून जमा होत आहे.

Dairy
मत्स्य शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडीट कार्ड -MAC21B0274

तरूणाच्या मेहनतील ग्रामपंचायतीची साथ

तरूणाची व्यावसायिक धडपड पाहून ग्रामपंचायत प्रशासनाकडून एक गाळा भाडेतत्त्वावर दिला असून दुध डेअरीत आज वळवाडे, मोराणे, सारदे, कोठरे तसेच गावातून दुध संकलित होत आहे. दुध डेअरीच्या कामासाठी प्रदिप (बंटी) आहिरे हे चंद्रकांत कोर यांना दुध संकलनात मदत करीत आहेत. आघार (ता.मालेगाव) येथील साई गिरणा दुध डेअरीला पोहच केले जात. दुध डेअरी संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे यांचेही प्रोत्साहन मिळत असल्याचे चंद्रकांत सांगतात.

''गावात दुध डेअरी सुरू केल्याने वाया जाणारा वेळ वाचत आहे. तसेच डेअरीमुळे गावात तरूण शेतीसह दुग्धव्यवसायाकडे वळू लागली आहेत.'' - विजय कोर, दुध व्यावसायिक अंबासन

Dairy
लसीकरणानंतर कोरोना झाल्यास तयार होते 'सुपर इम्युनिटी'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com