esakal | मामाच्या जाचामुळे भाचीची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

मामाच्या जाचामुळे भाचीची तणावातून आत्महत्या

sakal_logo
By
राजेंद्र बच्छाव

मामाच्या जाचामुळे भाचीची आत्महत्या

इंदिरानगर (नाशिक) : शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सख्ख्या मामाच्या जाचाला (harrasment) कंटाळून भाचीने आत्महत्या (suicide) केल्याची संतापजनक घटना पाथर्डी परिसरात घडली. (young girl suicide marathi crime news)

खोटे सांगून केली जबरदस्ती

‘तुझ्या आईची तब्येत खराब झाली आहे, तिला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला दवाखान्यात दाखल केले आहे,’ असे खोटे सांगून एका रूमवर तिला नेले. तेथे जाऊन शारीरिक संबंध ठेव, असे म्हणत जबरदस्ती केली. तरुणीने नकार दिल्याने मारहाण करत आई-वडिलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून पीडितेने शुक्रवारी (ता. ७) सकाळी दामोदरनगर, पाथर्डी फाटा येथील राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा: काय सांगता! 'या' बाजार समितीत कांदा फक्त दीड रुपये किलो

व्हिडिओ चॅटवरून दिला त्रास

या प्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजयकुमारविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता, व्हिडिओ व मोघम स्वरूपाच्या चॅटवरून तो मृत भाचीस त्रास देत होता, असे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे समजते.संशयित अजयकुमार (रा. सिडको) याने त्याच्या सख्ख्या भाचीवर २ तारखेलारला जबरदस्ती केली.

हेही वाचा: ग्रेट दादाजी! HRCT स्कोर 22, ऑक्सिजन लेव्हल 45 पुढे हरला कोविड