esakal | अगोदर वाटले 'तिचे' अपहरण झाले...पण पोलिसांनी तपासाची दिशा फिरवली तेव्हा धक्काच..!
sakal

बोलून बातमी शोधा

young couple.jpg

संबंधित मुलीचा तपास करत असताना सुरवातीला ती शिकत असलेल्या शाळेबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावरून ही मुलगी कुणासोबत जातानाचे दिसून आले. संबंधित मुलगी राहात असलेल्या परिसरात पोलिसांनी आपल्या खबऱ्यांमार्फत तपास सुरू केला. प्रथमदर्शनी या मुलीचे अपहरण झाल्याचे दिसून येत होते. मात्र गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाची दिशा वेगळ्या पद्धतीने फिरवली.

अगोदर वाटले 'तिचे' अपहरण झाले...पण पोलिसांनी तपासाची दिशा फिरवली तेव्हा धक्काच..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ सिडको : मित्रासोबत पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या पंधरा तासांत शोध घेत नवी मुंबई येथून तिला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. 

असा घडला प्रकार

शाळेत गेलेली मुलगी उशिरापर्यंत घरी परत आली नसल्याची तक्रार अंबड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांना घटनेची माहिती दिली. यावरून वरिष्ठांच्या आदेशानुसार चौधरी यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव, उपनिरीक्षक राकेश शेवाळे, सहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे, विजय शिंपी, हेमंत आहेर, मारुती गायकवाड, प्रशांत नागरे, संभाजी जाधव, उत्तम सोनवणे, अविनाश देवरे, कैलास बच्छाव, संदीप राजगुरू, पंकज शेळके यांचे पथक मुलीच्या शोधासाठी रवाना केले. संबंधित मुलीचा तपास करत असताना सुरवातीला ती शिकत असलेल्या शाळेबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावरून ही मुलगी कुणासोबत जातानाचे दिसून आले. संबंधित मुलगी राहात असलेल्या परिसरात पोलिसांनी आपल्या खबऱ्यांमार्फत तपास सुरू केला. प्रथमदर्शनी या मुलीचे अपहरण झाल्याचे दिसून येत होते. मात्र गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाची दिशा वेगळ्या पद्धतीने फिरवली.

हेही वाचा > हृदयद्रावक! वडिलांचा अंत्यविधी आटपायच्या आतच 'ती' परीक्षा केंद्रावर!...डोळ्यांतील अश्रु थांबता थांबेना...

अंबड पोलिसांनी पंधरा तासांत लावला छडा 

यावरून ही मुलगी मुंबईच्या दिशेने गेली असल्याचे निष्पन्न झाले. अंबड पोलिसांनी तत्काळ नवीन मुंबई व मुंबई पोलिसांना या मुलीचे छायाचित्र पाठविले. त्यावरून नवीन मुंबईतील एनआरआय पोलिस ठाण्यातील पोलिसांनी अल्पवयीन मुलीला एका अल्पवयीन मुलासह ताब्यात घेत अंबड पोलिसांना त्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी तत्काळ नवी मुंबईला धाव घेत या मुलीची ओळख पटवून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. 

VIDEO :...अन् 'त्याने' चक्क नेलकटरने नागाचे दातच काढले!

loading image