Nashik Fraud Crime : कर्जाचे अमीष दाखवून तरुणाची साडेअठरा लाखाला फसवणूक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

Nashik Fraud Crime : कर्जाचे अमीष दाखवून तरुणाची साडेअठरा लाखाला फसवणूक!

मालेगाव (जि. नाशिक) : डिजिटल क्रांतीमुळे आर्थिक व्यवहार करणे सुलभ व सोयीचे झाले असतानाच फसवणूक करणाऱ्यांनाही चांगभल करण्याची संधी मिळाली आहे. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढीस लागत आहेत.

अल्पशिक्षित व अज्ञानी नागरीकांची त्यात फसवणूकच होत आहे. पोहाणे (ता. मालेगाव) येथील तरुणाला कर्जाचे अमीष दाखवून त्याची आठ जणांनी वेगवेगळ्या खात्यात पैसे मागवून घेत सुमारे साडेअठरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Young man cheated for eighteen half lakhs by pretending to loan Nashik Crime News)

हेही वाचा: Uttar Pradesh Crime News: रक्ताच्या नात्याला फासला कलंक! बापानं स्वतःच्याच 7 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार, आईनं दाबलं चिमुरडीचं तोंड

गोरख दादाजी भामरे (वय ४४, रा. पोहाणे) या शेती व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या तरुणाला त्याच्या मोबाईलवर (८७६५८३९९६६) राहुल शर्मा याने मोबाईलवरुन (८३०७०१५५२१) या मोबाईल नंबरवर मॅसेज पाठवत प्रधानमंत्री योजनेद्वारे दोन टक्के व्याज व पन्नास टक्के सुट असा मॅसेज टाकून संशयितांनी वेगवेगळ्या दुरध्वनीवर गोरखला मॅसेज टाकत खातेनंबर देऊन वेगवेगळ्या आठ बँक खात्यांवर कर्जासाठी फोन पे व ऑनलाईन मनी ट्रान्सफर करुन तब्बल १८ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली. १० जून २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान हा प्रकार घडला.

या फसवणूक प्रकरणी गोरखने राहुल शर्मा, प्रदीप राणा, अमित चौधरी, अविनाश मल्होत्रा, सचिनकुमार, मनोजकुमार, संदीप आदी नावाने वेगवेगळ्या मोबाईल व विविध खाते क्रमांक देत ऑनलाईन पैसे मागवून फसवणूक केली.

गोरखच्या तक्रारीवरुन संशयितांविरुध्द वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांकडील तक्रार अर्जाची चौकशी करुन हा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: Nashik News : डॉ. हुसेन रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण केंद्र 3 वर्षापासून बंद!