Nashik : भावली धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आंघोळ करताना युवक बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik : भावली धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आंघोळ करताना युवक बेपत्ता

Nashik : भावली धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आंघोळ करताना युवक बेपत्ता

इगतपुरी शहर : भावली धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आंघोळीसाठी गेलेला एक तरुण वाहून गेल्याची घटना रविवारी (ता.२४) दुपारच्या सुमारास घडली. चार मित्रांच्या सोबत पोहत असताना हा युवक बुडाला. मित्रांनी त्याला वाचवायचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अखेर प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तातडीने कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ यांना आणि इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केले.

हेही वाचा: सोशल मिडियावर फिरणारे छायाचित्र खोटे; एकनाथ शिंदे नव्हे हे तर बाबा कांबळे

या दोन्ही टीमने शोधकार्य सुरु केले, मात्र पाऊस जास्त असल्याने पाण्याचा जोर वाढत असल्याने रात्री उशिरापर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. इगतपुरीजवळील एका बांधकामाच्या साइटवर सुपरवायझर म्हणून सुनील सोनू सांगळे हा काम करतो. त्याच्यासोबत काम करणारे त्याचे इतर सहकारी सुहास जगताप, ऋषिकेश गावले, दिनेश पंडित यांच्यासह जामुंडे गावाच्या परिसरात भावली धरणाच्या बॅकवाटरमध्ये दुपारच्या सुमारास चौघे आंघोळीसाठी गेले होते.

हेही वाचा: पकडायला गेले दारू अन् सापडला गुटखा; पिकअपसह मुद्देमाल जप्त

यापैकी सुनील सोनू सांगळे याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. ही घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ यांच्या संपर्कात चंद्रकांत सराई, सुरेश तेलम व अन्य सदस्यांनी सुनील सांगळे याचा शोध घेतला मात्र त्यांना उशिरापर्यंत यश आले नाही. पोलिस आणि प्रशासनाने याबाबत नोंद घेतली असून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. दरम्यान भावली धरण परिसरात वनविभागाने पर्यटकांना बंदी घातलेली असतांनाही पर्यटक चोरी छुप्या मार्गाने पर्यटनस्थळी दाखल होत असल्याने अशा घटना घडत आहेत.

Web Title: Young Man Missing While Bathing In Backwaters Of Bhavali Dam Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikrainBhavli Dam