Nashik News : तरुण सरपंचाची आगळीवेगळी उतराई! स्वखर्चाने गावाला दिले शुद्ध पाणी

Nashik
Nashikesakal

येवला : वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षीच गावाने प्रचंड बहुमताने थेट सरपंचपदी निवडून दिले. गावाच्या या प्रेमाची उतराई करण्यासाठी दिलेला शब्द पाळत चांदगावचे तरुण सरपंच प्रणव साळवे यांनी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्चून गावाला शुद्ध पाणी देण्यासाठी आरओ प्लॉंट दिला आहे. या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

चांदगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कांतिलाल साळवे व इतर स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता याठिकाणी आली. सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रणव साळवे या अवघ्या एकवीस वर्षाच्या तरुणाने बाजी मारली. साळवे घराण्याला राजकीय वारसा असून या गावात स्वर्गीय बाजीराव नाना साळवे, बबन साळवे, कांतिलाल साळवे यांनी सरपंचपद भूषविले.

Nashik
Nashik: स्पेशल चहावाला ‘संजू’चे दुकान बनले अभ्यासिका; देवमामलेदारांच्या नगरीला दांपत्यांचे मातृ-पितृ कार्य

आता प्रणव या गावाचे प्रथम नागरिक म्हणून नेतृत्व करणार आहे. या कुटुंबाने पंचायत समितीचे पाच वेळेस सभापतिपदही भूषविले आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर्श घेत गावाच्या विकासासाठी प्रणवने सरपंच होऊन गावाचा विकास करायचा हा विडा उचलला आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत गावाला त्याने जे शब्द दिले आहेत, त्या शब्दांची पूर्ती करायची ही मनाशी खूणगाठ बांधली आहे.

आजोबा स्वर्गीय बाजीरावनाना व साखरचंद साळवे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सरपंचपदाची धुरा हाती घेतल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यात स्वखर्चातून साडे तीन लाख रुपयांचे शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आरओ गावाला भेट दिली आहे.

Nashik
Success Story : वडिलांची स्वप्नपूर्ती करत निफाडचा चैतन्य बनला Indigoमघ्ये पायलट!

शब्दपूर्तीच्या पहिल्या कामाचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या साक्षीने सरपंच प्रणव साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसाला ५ हजार लिटर क्षमता या आरओची आहे. स्वर्गीय प्रवीण (गंगाराम) बाजीराव साळवे यांच्या स्मरणार्थ हे आरओ गावाला सरपंच साळवे यांनी दिले आहे. महिनाभरात ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

१० रुपयात २० लिटर पाणी

गावातील सुमारे २५० कुटुंबांना या शुद्ध पाण्याचा आरोग्यासाठी फायदा होणार असल्याने ग्रामस्थही आनंदात आहे. तरुण सरपंच झाल्याने गावाचा विकासाच्या अपेक्षाही प्रणवकडून ग्रामस्थांच्या वाढल्या आहेत. १ रुपयात २ लिटर तर १० रुपयात २० लिटर पाणी मिळणार असून गावातील सार्वजनिक उत्सव, विवाह व इतर विधी यासाठी मोफत पाणी सेवा देण्यात येणार असल्याचे सरपंच साळवे यांनी सांगितले.

Nashik
Success Story: पुणेकर तरुणाची कमाल! मातीशिवाय उगवलं 'केशर', महिन्याला लाखोंची कमाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com