esakal | डोळ्यासमोर काळ अन् गळ्याभोवती बांधलेल्या स्टोलमुळे वाचली तरुणी; अंगावर काटा आणणारी घटना
sakal

बोलून बातमी शोधा

woman on scooty.jpg

युवती ॲक्टिव्हा दुचाकीने हनुमानवाडी-मखमलाबाद रोडने म्हसरूळकडे जात होती. त्या वेळी सिग्नलजवळ थांबली असता, अचानक हवेतून जणू तिचा काळा येत होता. काय घडले वाचा...

डोळ्यासमोर काळ अन् गळ्याभोवती बांधलेल्या स्टोलमुळे वाचली तरुणी; अंगावर काटा आणणारी घटना

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : युवती ॲक्टिव्हा दुचाकीने हनुमानवाडी-मखमलाबाद रोडने म्हसरूळकडे जात होती. त्या वेळी सिग्नलजवळ थांबली असता, अचानक हवेतून जणू तिचा काळा येत होता. काय घडले वाचा...

अचानक हवेतून जणू तिचा काळा येत होता

गंगापूर रोडवरून मंगळवारी (ता. ५) दुपारी चारच्या सुमारास पूजा गणेश संदानशिव (२५, रा. म्हसरूळ) ही युवती ॲक्टिव्हा दुचाकीने हनुमानवाडी-मखमलाबाद रोडने म्हसरूळकडे जात होती. त्या वेळी सिग्नलजवळ थांबली असता, अचानक हवेतून नायलॉन मांजा आला आणि तिच्या गळ्याला घासला गेला. पूजाने स्टोल बांधल्यामुळे आणि वेळीच तिचे लक्ष गेल्याने तिने एक हात मध्ये आडवा केला. यामुळे गळ्याभोवती खोलवर गंभीर जखमा झाल्या नाहीत, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही बाब लक्षात येताच परिसरातील महिला व पुरुषांनी धाव घेत पूजाला धीर दिला आणि दिंडोरी रोडवरील एका खासगी रुग्णालयात त्वरित उपचारासाठी हलविले. वेळीच औषधोपचार मिळाल्याने पूजाला झालेल्या जखमांमधून होणारा रक्तस्त्राव थांबला.

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला 

मोठा अनर्थ टळला. 

नायलॉन मांजाने काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वार महिलेचा बळी घेतला. ही घटना ताजी असताना मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील सिग्नलवर एका दुचाकीस्वार युवतीचा गळा नायलॉन मांजाने कापला गेला. गळ्याभोवती असलेला स्टोल आणि युवतीने दाखविलेले प्रसंगावधानामुळे नायलॉन मांजाने ती किरकोळ जखमी झाली. परिरसरातील रहिवाशी महिलांनी त्वरित तिला जवळच्या रुग्णालयात हलविले आणि औषधोपचार उपलब्ध करून दिल्याने मोठा अनर्थ टळला. 

हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 
 

loading image
go to top