Nashik News : अभ्यासाच्या तणावातून चिचोंडीत तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saurabh Gaikwad

Nashik News : अभ्यासाच्या तणावातून चिचोंडीत तरुणाची आत्महत्या

चिचोंडी (जि. नाशिक) : चिचोंडी बुद्रुक (ता. येवला) येथील सौरभ नवनाथ गायकवाड (वय १८) या महाविद्यालयीन तरुणाने अभ्यासाच्या तणावातून रविवारी (ता. १२) पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. (Youth commits suicide in Chichondi due to study stress Nashik News)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

सौरभ हा एकुलता एक मुलगा होता. तो नीट (Neet)चा अभ्यास करत होता. स्वभावाने अतिशय शांत व मनमिळाऊ असलेल्या सौरभच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बारावीत चांगले यश मिळाल्याने डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न होते. येवला शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार अर्णव थोरात तपास करत आहेत.