युवक- युवतींनी व्यवसायाकडे वळावे : डॉ. राहुल रनाळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Rahul Ranalkar

युवक- युवतींनी व्यवसायाकडे वळावे : डॉ. राहुल रनाळकर

म्हसरूळ (नाशिक) : महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नोकरी हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून न चालता काळानुरूप व्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी केले. म्हसरूळ येथील धामणकर महाविद्यालयात प्रधानमंत्री कौशल्य विकास व राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद आयोजित दुचाकी दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल रनाळकर म्हणाले, की नोकरी मिळविण्यासाठी किंवा भावी आयुष्यात व्यवसाय करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी शिक्षण घेत असतो. परंतु, महाविद्यालयाने प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगार मिळविण्याची एक संधी उपलब्ध केली आहे. लोकसंख्येच्या मानाने प्रत्येक घरात दोन ते तीन दुचाकी आहेत. यामुळे दुचाकी दुरुस्ती व्यवसायात हे प्रशिक्षण घेतल्यानंतर युवतीसुद्धा दुचाकी दुरुस्तीचे काम करू शकतात, हा नवा संदेश संस्थेने दिला आहे. प्रास्ताविकात संयोजक चव्हाणके यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकासांतर्गत सुरू असलेले कार्यक्रमाविषयी माहिती दिली. कामामुळे असंघटित कामगारांची शासन दरबारी नोंद होत आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: नाशिक : मृत कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याचा मार्ग मोकळा

प्राचार्य डॉ. वाकचौरे म्हणाले, की विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान संपादन करता यावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासन हा कार्यक्रम राबवत आहे. या माध्यमातून मिळालेले प्रमाणपत्रदेखील भविष्यात उपयुक्त ठरणार आहे. दुचाकी दुरुस्ती असोसिएशनचे सचिव लोंढे म्हणाले, की गेल्या दोन वर्षात मुलींच्या दोन बॅचेस घेत जवळपास पस्तीस ते चाळीस मुलींना दुचाकी दुरुस्तीचे ज्ञान दिलेले आहे. भविष्यात दुचाकी दुरुस्ती व्यवसायात मुलीही मुलांच्या बरोबरीने उभ्या राहतील. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आजतागायत खेडोपाडी व पाड्यावर जाऊनही भर उन्हाळ्यात हे प्रशिक्षणाचे काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

‘ऑल टाइप्स इन वन हाऊस’

‘तनिष्का’ च्या माध्यमातून अनेक महिलांनी विविध व्यवसाय सुरू केले आहेत. इनोव्हेटिव्ह असे दुचाकी दुरुस्तीचे शोरूम सुरू होऊ शकतात. त्यात ‘ऑल टाइप्स इन वन हाऊस’ अर्थात, एकाच छताखाली दुचाकी दुरुस्ती, स्पेअर पार्ट, टायर, कुशन, वॉशिंग आदी सेवा उपलब्ध करून देऊ शकता येतील, असेही डॉ. राहुल रनाळकर म्हणाले.

हेही वाचा: अर्थकारणात केटरिंग व्‍यवसायाचे योगदान!

या वेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. वाकचौरे, कला विभागाच्या प्राचार्या श्रीमती पाटील, दुचाकी दुरुस्ती असोसिएशनचे सचिव लोंढे , श्री. जाधव, श्रीमती. रायते, प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम संयोजक चव्हाणके आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Youth Should Turn To Business Dr Rahul Ranalkar Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikYouthBusiness